esakal | Corona Update: राज्यात कोरोना रुग्णांची उच्चांकी वाढ; मृतांचा आकडा 500 च्या पार
sakal

बोलून बातमी शोधा

corona

Corona Update: राज्यात कोरोना रुग्णांची उच्चांकी वाढ; मृतांचा आकडा 500 च्या पार

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

मुंबई- महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 68 हजार 631 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर 45 हजार 654 कोरोना रुग्णांनी विषाणूवर मात केली आहे. चिंता वाढवणारी माहिती म्हणजे दिवसभरातील मृत्यांच्या संख्येने पाचशेचा आकडा पार केला आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 503 रुग्णांना कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. कोरोना महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत राज्यात 60 हजार 473 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत राज्यात 31 लाख 06 हजार 828 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. राज्यात सध्या कोरोनाचे 6 लाख 70 हजार 388 सक्रिय रुग्ण आहेत. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. राज्यात आज 68631 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 45654 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 3106828 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 670388 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 80.92% झाले असल्याची माहिती टोपे यांनी दिली. काल राज्यात 67 हजार 123 रुग्णांची नोंद झाली होती.

हेही वाचा: कोरोना वाढत असल्याने राहुल गांधींचा मोठा निर्णय; मोदी-ममता अनुकरण करणार का?

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आलेख चढता राहीला आहे. रुग्णांची संख्या 60 हजारांच्या पुढे नोंदली जात आहे. कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. असे असले तरी राज्यातील रुग्णांची संख्या आटोक्यात आलेली नाही, उलट ती अधिकच वाढत आहेत. त्यामुळे राज्यात कडकडित लॉकडाऊन लागू केला जाईल काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे. आरोग्य व्यवस्थेवर मोठा भार पडत असल्याने चिंता वाढली आहे.

loading image
go to top