दिलासा! दिवसभरात 12 जिल्हे, 12 महापालिकांमध्ये कोरोनाने एकही मृत्यू नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून दिलासादायक अशी आकडेवारी समोर येत आहे.

दिवसभरात 12 जिल्हे, 12 महापालिकांमध्ये कोरोनाने एकही मृत्यू नाही

मुंबई - कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अद्याप नव्या रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. देशातील अनेक भागात तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. कोरोनाचा डेल्टा व्हेरिअंटचा संसर्ग वेगानं होतं असल्यानं तिसरी लाट येईल असं म्हटलं जात आहे. दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून दिलासादायक अशी आकडेवारी समोर येत आहे. रविवारी राज्यातील 12 जिल्हे आणि 12 महापालिकांच्या क्षेत्रात एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नाही. तर दिवसभरात राज्यात 157 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला.

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 6 हजार 479 नवीन रुग्ण सापडले. तर 4 हजार 110 जण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत राज्यातील 60 लाख 94 हजार 896 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रिकव्हरी रेट 96.59 टक्के इतका आहे. रविवारी दिवसभरात 157 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यातील मृत्यूचा दर 2.1 टक्के इतका झाला आहे.

हेही वाचा: ग्रामीण भागाला दिलासा! आता मिळणार सीटी स्कॅन, MRI, डायलिसीस सुविधा

राज्यातील 12 महानगरपालिका आणि 12 जिल्ह्यात रविवारी कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. यामध्ये ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, पालघर, रायगड, पनवेल, मालेगाव, नंदुरबार, परभणी, लातूर, नांदेड, अमरावती, अकोला, धुळे, यवतमाळ, जालना यांचा समावेश आहे.

राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये 100 पेक्षा कमी रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये नंदुरबार, हिंगोली, अमरावती, वाशिम, गोंदिया, गडचिरोली यांचा समावेश आहे. तर राज्यात सर्वाधिक रुग्णसंख्या पुणे जिल्ह्यात असून इथे 15 हजार 680 जण उपचार घेत आहेत.

हेही वाचा: 'एमपीएससी'तर्फे मेगाभरती ! आयोगाच्या सदस्यांची नावे अंतिम

याशिवाय पाच जिल्ह्यात रविवारी एकाही नव्या रुग्णाची नोंद झाली नाही. यात नंदूरबार, नांदेड, वर्धा, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे. अहमदनगरमध्ये सर्वाधिक 888 रुग्ण सापडले आहेत. राज्यात आतापर्यंत 4 कोटी 81 लाख 85 हजार 350 जणांची टेस्ट झाली. यापैकी 63 लाख 10 हजार 194 जणांना कोरोनाची लागण झाली. सध्या राज्यात 4 लाख 67 हजार 986 जण होम क्वारंटाइन आहेत.

Web Title: Corona Update Maharashtra No Death Record In 12 Districts

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Maharashtra News