
राज्य सरकारच्या गृह, कृषी, महसूल, शिक्षण यासह अन्य महत्त्वाच्या विभागांमधील 17 हजारांहून अधिक पदे आयोगाच्या माध्यमातून भरली जाणार आहेत.
'एमपीएससी'तर्फे मेगाभरती ! आयोगाच्या सदस्यांची नावे अंतिम
सोलापूर : महाराष्ट्र राज्य शासनाच्या (Government of Maharashtra) 46 विभागांमध्ये अडीच लाखांपर्यंत पदे रिक्त आहेत. कोरोनामुळे (Covid-19) मागील दोन वर्षांत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) माध्यमातून नवी पदभरती झालेली नाही. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारच्या गृह, कृषी, महसूल, शिक्षण यासह अन्य महत्त्वाच्या विभागांमधील 17 हजारांहून अधिक पदे आयोगाच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. (Mega recruitment of 17 thousand posts will be done by MPSC-ssd73)
हेही वाचा: फेसबुकवरुन ओळख केली अन् दोन दिवसांत आठ हजार घेऊन गेली
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या चार सदस्यांची पदे रिक्त आहेत. सद्य:स्थितीत आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सतीश गवई यांच्याकडे असून एकमेव सदस्य म्हणून दयानंद मेश्राम (Dayanand Meshram) हे कार्यरत आहेत. जून 2018 पासून आयोगातील सदस्यांची पदे रिक्त असल्याने उमेदवारांची परीक्षा घेणे तथा परीक्षांचे नियोजन करणे, त्यांच्या मुलाखती घेण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी आयोगातील पदे 31 जुलैपर्यंत भरली जातील, असे विधानसभेच्या अधिवेशनात स्पष्ट केले होते. मात्र, जुलै संपल्यानंतरही त्यासंदर्भात काहीच कार्यवाही न झाल्याने स्पर्धा परीक्षा देणारे उमेदवार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासनाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharne) यांनी आयोगातील सदस्यांची नावे निश्चित झाली असून त्याची घोषणा दोन दिवसांत होईल, असे "सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले आहे. मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द झाल्यानंतर त्या प्रवर्गातील उमेदवारांना ईडब्ल्यूएस व खुल्या प्रवर्गातून संधी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने फेरनिकाल तयार केला असून, 15 ऑगस्टपूर्वी तो जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर प्रतीक्षेतील उमेदवारांना नियुक्ती, प्रलंबित परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करणे, नव्या पदांची भरती व त्याचे वेळापत्रक जाहीर करणे, मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांच्या मुलाखती घेणे, अशी कार्यवाही केली जाणार आहे.
हेही वाचा: "आमच्या देवळातील देवच निघून गेला"
राज्य शासनाच्या विविध विभागांमधील रिक्त पदांची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला 15 ऑगस्टपूर्वी दिली जाईल. वित्त विभागाच्या परवानगीने जवळपास 17 हजार पदांची भरती होईल.
- दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री, सामान्य प्रशासन, महाराष्ट्र
भरणे म्हणाले...
"एमपीएससी'च्या सदस्यांची नावे अंतिम; दोन दिवसांत नावे होतील जाहीर
राज्य सरकारच्या विविध विभागांमधील 17 हजारांहून अधिक पदे आयोगातर्फे भरली जातील
मराठा आरक्षण रद्दनंतर राज्य सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार ऑगस्टअखेर जाहीर होतील फेरनिकाल
पूर्व, मुख्य आणि मुलाखतीतून उत्तीर्ण होऊन निवड झालेल्यांनाही ऑगस्टअखेर मिळेल नियुक्ती
राज्य शासनाच्या विविध विभागांमधील रिक्त पदांची माहिती 15 ऑगस्टपर्यंत आयोगाला दिली जाईल
Web Title: Mega Recruitment Of 17 Thousand Posts Will Be Done By Mpsc
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..