esakal | Corona Update: राज्यातील रुग्णांची संख्या पुन्हा 60 हजारांच्या पुढे; 349 जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

Corona Update: राज्यातील रुग्णांची संख्या पुन्हा 60 हजारांच्या पुढे; 349 जणांचा मृत्यू

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

मुंबई- राज्यात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. राज्यात कलम 144 लागू करण्यात आला असून संचारबंदी करण्यात आली आहे. असे असतानाही राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाहीये. राज्यात गेल्या 24 तासांत 61 हजार 695 नवे रुग्ण आढळले आहेत, तर 53 हजार 335 लोकांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत 349 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. राज्यात आतापर्यंत 59 हजार 153 लोकांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 36 लाख 39 हजार 855 झाली आहे, तर आतापर्यंत 29 लाख 59 हजार 056 रुग्णांनी कोरोनावर मात केलीये. राज्यात 6 लाख 20 हजार 060 सक्रीय रुग्ण आहेत.