esakal | Corona Update : राज्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूदरात वाढ!
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Corona Update

Corona Update : राज्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूदरात वाढ!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात काल 66 रुग्ण दगावले होते, त्यात वाढ होऊन आज 147 रुग्ण दगावले. मृतांचा एकूण आकडा 1,30,753 वर पोहोचला आहे. आज सर्वाधिक 55 मृत्यू कोल्हापूर मंडळात नोंदवण्यात आले. तर ठाणे 39, पुणे 9,औरंगाबाद 3,नाशिक 37,अकोला 1,नागपूर 1 व लातूर मंडळ 2 मृत्यू नोंदवले गेले. आज मृत्यूदारात ही वाढ झाली असून मृत्यूचा दर 2.4 वरून 2.09 टक्के इतका झाला आहे. (Corona Update Mortality of Corona patients increases in maharashtra aau85)

राज्यात आज दिवसभरात 6,910 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 62,29,596 झाली आहे. राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊन 94,593 पर्यंत खाली ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

हेही वाचा: हरियाणात सापडली एक लाख वर्षांपूर्वीच्या भित्तीचित्रांची गुहा; पाहा फोटो

आज दिवसभरात 7,510 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 60,00,911 इतकी आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  96.33 टक्के एवढे झाले आहे.

हेही वाचा: स्मार्टफोन हॅक झालाय की नाही, कसे ओळखाल? हॅक झाल्यास काय कराल?

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,58,46,165 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62,29,596 (13.59 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,60,354 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,977 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

loading image