esakal | Corona Update : राज्यातील मृत्युदर १.९४ टक्क्यांवर
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Corona Update

Corona Update : राज्यातील मृत्युदर १.९४ टक्क्यांवर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात कोरोनामुळं मृत्यूचे सत्र सुरूच असून आज राज्यात 237 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. आठड्याभरापूर्वीच्या 999 मृत्यूंचाही यात समावेश केला गेल्याने आज राज्यात एकूण 1,236 मृत्यूंची नोंद करण्यात आली. आज झालेल्या मृत्यूंमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली असून येथे 30 मृत्यू नोंदवण्यात आले. तर नाशिक मनपा 18, रायगड 17, सातारा 16 मृत्यू झाले. त्यामुळे मृत्यूचा दर 1.94 टक्क्यांवर पोहोचला आहे. (Corona Update Mortality rate of corona victims in state near about two per cent)

आज नोंद झालेल्या 237 मृत्यूंपैकी 144 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 93 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. मृतांचा एकूण आकडा 1,15,390 वर पोहोचला आहे. राज्यात आज दिवसभरात 10,107 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 59,34,880 झाली आहे. राज्यात आज रोजी एकूण 1,36,661 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आज दिवसभरात 10,567 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 56,79,746 इतकी आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून ते 95.7 टक्के एवढे झाले आहे.

आज 1,236 अतिरिक्त मृत्यूची नोंद

आज राज्यात दैनंदिन मृत्यूपेक्षा 999 अतिरीक्त मृत्यूंची नोंद कोविड पोर्टलवर करण्यात आली. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या 1,236 ने वाढली असल्याचे सांगण्यात आले. 

हेही वाचा: "कोरोनावरील 2 DG औषध सर्व व्हेरियंट्सवर प्रभावी"

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,86,41,639 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,34,880 (15.36 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 8,78,781 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 5,401 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

loading image