esakal | कोरोनावरील 2 DG औषध सर्व व्हेरियंट्सवर प्रभावी; अभ्यासातील निष्कर्ष
sakal

बोलून बातमी शोधा

2-DG medicine developed by DRDO

"कोरोनावरील 2 DG औषध सर्व व्हेरियंट्सवर प्रभावी"

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : DRDO नं विकसित केलेलं कोरोनाप्रतिबंधक औषध 2-DG हे सर्व प्रकारच्या व्हेरियंटवर प्रभावी असल्याचं नव्या अभ्यासातून समोर आलं आहे. हे औषध कोरोनाच्या विषाणूचं मल्टिप्लिकेशन तसेच आजाराचा प्रभाव आणि मृत पेशींचं प्रमाण कमी करत असल्याचं या अभ्यासातून पुढे आलं आहे. त्यामुळे कोरोनाच्या उपचारपद्धतींमध्ये याचा वापर करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. (DRDO anticovid drug 2DG found effective against all variants Study)

हेही वाचा: 'घोटाळ्याचा आरोप करणाऱ्यांनी पावती दाखवून देणगी परत घ्यावी'

या अभ्यासाचा अहवाल १५ जून रोजी प्रकाशित झाला. मात्र, त्याचं अद्याप पुनरावलोकन झालेलं नाही. अनंत नारायण भट्ट, अभिषेक कुमार, योगेश राय, धिविया वेदगिरी आणि इतरांनी या अहवालाचं लेखन केलं आहे.

काय आहे 2DG औषध जाणून घ्या?

2DG हे औषध DRDO आणि डॉ. रेड्डी लॅबोरेटरीजनं विकसित केलं आहे. या औषधाला १९ मे रोजी साधारण ते गंभीर कोरोनाच्या रुग्णांवर वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. क्लिनिकल ट्रायलमध्ये हे औषध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णाला लवकर बरं करण्यास सक्षम ठरलं आहे. तसेच ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णाला नॉर्मल स्थितीत आणण्यास मदत करते. तोंडावाटे देण्यात येणारं हे औषध डॉ. रेड्डी लॅबनं सॅशेच्या स्वरुपात बाजारात आणलं आहे.

हेही वाचा: राम मंदिर जमीन घोटाळा : संजय सिंहांचा कोर्टात जाण्याचा इशारा

दोन आठवड्यांपूर्वी DRDO नं कोरोनाबाधित रुग्णावर 2-DG औषधाच्या वापराची नियमावली जाहीर केली होती. तसेच कोमॉर्बेडिटीज म्हणजे असाध्य आजार असलेल्या रुग्णांना हे औषध देताना काळजी घेण्याचं आवाहनही केलं होतं. या आजारांमध्ये नियंत्रणात न येणारा मधुमेह, हृदयाचा गंभीर आजार आणि श्वासासंबंधीचे आजार यांबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.

loading image