esakal | Corona Update: राज्यात मृत्यूदर वाढला; 7 लाख सक्रिय रुग्ण

बोलून बातमी शोधा

corona update

गेल्या 24 तासांत राज्यात 66 हजार 191 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 61 हजार 450 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

Corona Update: मृत्यूदर वाढला; राज्यात 7 लाख सक्रिय रुग्ण

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

मुंबई- महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होण्याचं नाव घेत नाहीये. राज्यात 60 हजारांपेक्षा अधिकच रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या 24 तासांत राज्यात 66 हजार 191 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 61 हजार 450 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 832 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत राज्यात एकूण 64 हजार 760 रुग्णांचा कोरोनामुळे जीव गेलाय. आतापर्यंत 35 लाख 30 हजार 060 रुग्णांना घरी सोडण्यात आलं असून 6 लाख 98 हजार 354 सक्रिय रुग्ण आहेत. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

कोविड प्रकरणांच्या व्यवस्थापनावर राज्य सरकारचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी मृत्यूची संख्या जास्त असल्याचे कारण सांगितले. “बेड आणि ऑक्सिजनची कमतरता, रुग्णांना उशिरा दाखल करणे यामुळे मृत्युदर वाढत असल्याचे ही त्यांनी सांगितले. सध्या महाराष्ट्रात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 6 लाख 98 हजार 354 आहे.चाचणी निदान अहवाल आणि उपचारांना विलंब होत आहे. शिवाय अहवाल येण्यास चार ते पाच दिवस लागतात. यानंतर बेड नाहीत आणि त्यामुळे मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे असे जनरल फिजिशियन डॉक्टर रुपेश वडगावकर यांनी सांगितले. वडगावकर ज्यांनी 15 हजारापेक्षा जास्त कोविड रूग्णांवर उपचार केले आहेत. ते ताप असलेल्या प्रत्येक रूग्णाला संभाव्य कोविड रूग्ण म्हणूनच पाहतात आणि त्या धर्तीवर उपचार सुरू करतात. “मी सौम्य अँटीबायोटिक, अँटी-इंफ्लेमेटरी ड्रग्स आणि इम्यून बूस्टर्सपासून सुरुवात करतो जेणेकरून महत्वाचा वेळ वाचला जाईल असे ही त्यांनी पुढे सांगितले.