मोठी ब्रेकिंग ! प्रजासत्ताक दिनी मिळणार कोरोनावरील लस

 3modi_20on_20vaccine.jpg
3modi_20on_20vaccine.jpg

सोलापूर : पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट व भारत बायोटेकची लस अंतिम टप्प्यात आहे. कोरोनाचे संकट हद्दपार करुन देशाला कोरोनामुक्‍त करण्याच्या हेतूने प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधून कोरोनावरील लस पंतप्रधान नरेंद्र मोदी तथा केंद्र सरकारकडून 26 जानेवारीला कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस वितरीत केली जाणार आहे. त्यानुसार नियोजन सुरु असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ सूत्रां​नी सांगितले.

चार टप्प्यात लसीचे वितरण
राज्यातील आठ विभागीय ठिकाणी लस साठवण्यासाठी वॉकिंग फ्रिजर व वॉकिंग कुलर दिले जाणार आहेत. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात लस येईल. त्यानुसार आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईनवरील कर्मचारी, 50 वर्षांवरील नागरिक आणि को- मॉर्बिड रुग्ण, अशा टप्प्यात लस दिली जाणार आहे.
- डॉ. अर्चना पाटील, संचालिका, सार्वजनिक आरोग्य

राज्यातील रुग्णसंख्या 19 लाखांच्या उंबरठ्यावर असून मृतांची संख्या 48 हजारांहून अधिक झाली आहे. जानेवारीअखेर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबविली, नाशिक, नगर, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, औरंगाबाद, नागपूर, जळगाव या जिल्ह्यांमधील कोरोनाचा प्रादुर्भाव म्हणावा तितका कमी झालेला नाही. दरम्यान, पहिल्या टप्प्यात जगातील 18 देशांमधील सुमारे 30 कोटी नागरिकांना लस देण्याचे नियोजन मोदी सरकारने केले आहे. जागतिक अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम करणारे कोरोनाचे महासंकट लवकर दूर व्हावे, यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. कोरोनावरील लस अंतिम टप्प्यात आली असून प्रयोगाचा अंतिम अहवाल डिसेंबरअखेर केंद्राला जाणार आहे. त्यानुसार विविध राज्यांमधून आलेली मागणी आणि उपलब्ध लसीचा अंदाज घेऊन लस वितरीत केली जाणार आहे. दरम्यान, सर्वाधिक रुग्ण आणि मृत्यू असलेल्या शहरांना प्राधान्य राहील की सर्वच जिल्ह्यांना सरसकट लस द्यावी, याचेही नियोजन सुरु आहे. मात्र, लसीचे स्वरुप (कातडीखाली द्यायची की तोंडावाटे दिली जाईल की नाकातून दिली जाणार) कसे असेल याबाबत अद्याप काहीच स्पष्टपणे सांगता येत नसल्याचेही वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.

ठळक बाबी...

  • आरोग्य विभागातील साडेतीन लाख कर्मचाऱ्यांची संकलित झाली माहिती
  • लस आल्यानंतर तालुकानिहाय स्थापन होणार संनियंत्रण समिती
  • पुणे, ठाणे, नगर, अकोला, कोल्हापूर, लातूर, औरंगाबाद येथे लस साठविण्याची तयारी
  • लस देण्यासाठी तब्बल दिड लाख कर्मचाऱ्यांना दिले जाईल प्रशिक्षण
  • कोरोनावरील लस कशी दिली जाणार, त्याचे साईड इफेक्‍टबद्दल काहीच स्पष्टता नाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com