ब्रेकिंग ! करमाळ्यात कोरोनाचा एन्ट्री; अक्‍कलकोटमध्ये सापडले नवे सात रुग्ण 

तात्या लांडगे
Monday, 22 June 2020

अक्‍कलकोटमध्ये सात तर करमाळ्यात सापडला एक रुग्ण 
सोलापुरात कोरोना या विषाणूची एन्ट्री झाल्यापासून तब्बल अडीच महिने कोरोनापासून चार हात लांब असलेल्या करमाळ्यात आता कोरोनाची एन्ट्री झाली आहे. सोमवारी (ता. 22) करमाळ्यातील झरे या गावी एक पुरुष कोरोना पॉझिटिव्ह सापडला आहे. तर दुसरीकडे अक्‍कलकोट तालुक्‍यातील बोरगाव, सलगर, करजगी, मैंदर्गी, बुधवार पेठ येथे प्रत्येकी एक तर उल्हासनगरात दोन रुग्ण कोरोनाबाधित सापडले आहेत. 

सोलापूर : सोलापुरात कोरोना या विषाणूची एन्ट्री झाल्यापासून तब्बल अडीच महिने कोरोनापासून चार हात लांब असलेल्या करमाळ्यात आता कोरोनाची एन्ट्री झाली आहे. सोमवारी (ता. 22) करमाळ्यातील झरे या गावी एक पुरुष कोरोना पॉझिटिव्ह सापडला आहे. तर दुसरीकडे अक्‍कलकोट तालुक्‍यातील बोरगाव, सलगर, करजगी, मैंदर्गी, बुधवार पेठ येथे प्रत्येकी एक तर उल्हासनगरात दोन रुग्ण कोरोनाबाधित सापडले आहेत. 

 

सोलापूर शहरातील रुग्णांची संख्या दोन हजारांवर पोहचली आहे. तर आता जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 204 झाली आहे. त्यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 87 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून 106 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सोमवारी (ता. 22) 107 जणांच्या अहवालापैकी आठ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. 21 जूनपर्यंत कोरोनापासून जिल्ह्यातील मंगळवेढा आणि करमाळा हे दोन तालुके दूर होते. मात्र, आता करमाळ्यात 22 जूनला कोरोनाने एन्ट्री केली आहे. शहरात कोरोनाचा विळखा वाढत असतानाच आता कोरोनाबाधित रुग्णांचा आलेख जिल्ह्यात वाढत आहे. दरम्यान, जिल्हाबंदी असतानाही विनापरवाना जिल्ह्यात छुप्या मार्गाने येणाऱ्यांची संख्या वाढत असल्यानेही चिंता व्यक्‍त केली जात आहे. 

मंगळवेढा कोरोनापासून दूरच 
सोलापूर जिल्ह्यातील अक्‍कलकोट तालुक्‍यात सर्वाधिक 37 तर बार्शीत 30, उत्तर सोलापुरात 13, मोहोळ तालुक्‍यात दहा, माळशिरसमध्ये पाच, माढ्यात सात, पंढरपुरात सात, सांगोल्यात तीन तर करमाळा तालुक्‍यात एक रुग्ण सापडला आहे. जिल्ह्यातील 10 तालुक्‍यात कोरोना रुग्णांची दररोज भर पडत असतानाच मंगळवेढा तालुका मात्र, अद्यापही कोरोनापासून दूर आहे. त्यामुळे तेथील प्रशासन व नागरिकांचे कौतूक होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronas entry into Karmala