esakal | लॉकडाउन होणार नाही असं धोरण ठरवावं लागेल  - चंद्रकांत पाटील 
sakal

बोलून बातमी शोधा

लॉकडाउन होणार नाही असं धोरण ठरवावं लागेल  - चंद्रकांत पाटील 

गरज पडल्यास राज्यात पुन्हा लॉकडाउन लावण्यात येईल, असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं

लॉकडाउन होणार नाही असं धोरण ठरवावं लागेल  - चंद्रकांत पाटील 

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

राज्यात दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यातील काही शहरांमध्ये लॉकडाउनही लावण्यात आले आहेत. गरज पडल्यास राज्यात पुन्हा लॉकडाउन लावण्यात येईल, असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. यावरुन विरोधीपक्षानं सत्ताधारी ठाकरे सरकारला चांगलेच वेटीस धरलं आहे. आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारच्या लॉकडाउनच्या निर्णायवर टीका करत, राज्यात पुन्हा लॉकडाउन होणार नाही असं धोरण ठरवावं लागेल असा सल्लाही दिला आहे. 

चंद्रकांत पाटील पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी लॉकडाउन संदर्भात आपलं मत व्यक्त केले. ते म्हणाले की, त्या त्या जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊनच लॉकडाउनचा निर्णय घ्यायला हवा. राज्य सरकारनं लॉकडाउन न करता निर्बंध घालायला हवेत. तसेच मॉल, हॉटेलमध्ये काही निर्बंध हवे आहेत. 

राज्यातील शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार गोंधळलेले असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांची वाट लागली, असा आरोप यावेळी त्यांनी केला. ते म्हणाले की, सरकारमध्ये बेबंदशाही आहे. आपापसात ताळमेळ नाही. सरकारमधील प्रत्येक नेता वेगळी भूमिका मांडतो. राज्यातील महाविकासआघाडी सरकार एक नंबर लबाड सरकार आहे. तुम्ही परीक्षेची तारीख जाहीर करणार म्हटलात? पण विद्यार्थ्यांनी तुमच्यावर का विश्वास ठेवायचा. जिथे जिथे आंदोलन होणार तिथे भाजप जाणारच, असेही ते म्हणालेत. 

व्यापार बंद करा, कंपन्या बंद करा, हे काही परवडणारे नाही..त्यामुळे लॉकडाऊन करू नये..जगात अनेक आजार आले, आताही आहेत.. योग्य ती काळजी घेऊन सर्व व्यवहार सुरू राहील पाहिजे..कर्नाटक सरकारने योग्य ती खबरदारी घेत परीक्षा घेतल्या..लॉकडाऊन होणार नाही असे धोरण ठरवावे लागेल, असे यावेळी ते म्हणाले. 
 

loading image