दहा महापालिकांमध्ये काय गाजणार?

Corporation Election : Current situation
Corporation Election : Current situation

■ मुंबई

  • स्थापना : 1882 मध्ये देशातील पहिली महानगरपालिका म्हणून अस्तित्वात आली
  • लोकसंख्या : सुमारे सव्वा कोटी
  • सदस्य संख्या : 227
  • सत्ताधारी पक्ष : शिवसेना-भाजप (युती)
  • महापौर : स्नेहल आंबेकर (शिवसेना)
  • उपमहापौर : अलका केरकर (भाजप)
  • पक्षीय बलाबल : एकूण 227

शिवसेना : 89
भाजप : 32
कॉंग्रेस : 52
मनसे : 28
राष्ट्रवादी कॉंग्रेस : 14
समाजवादी पक्ष : 8
भारतीय शेकाप : 1
अपक्ष : 4

  • महत्त्वाचे प्रश्न :
  1. आशियातील सर्वांत मोठी महानगरपालिका असूनही अतिक्रमणाची मोठी समस्या.
  2. शहरात दररोज तयार होणाऱ्या सुमारे 9 हजार टन कचाऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे मोठे आव्हान.
  3. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला 'स्मार्ट सिटी' करण्याचे आव्हान.
  4. सुमारे 37 हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असूनही निम्याहून अधिक आस्थापना खर्च. तसेच भ्रष्टाचाराची मोठी समस्या.
  5. झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येला पाणी, वीज, रस्ते, आरोग्य या मूलभूत सुविधा उबलब्ध करून देण्याचे आव्हान.
  6. ब्रिमस्टोवॅड योजनेची 100 टक्के अंमलबजावणी करून पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्यापासून मुंबई वाचविण्याचे आव्हान.
  7. दरवर्षी करोडो रुपये खर्च करूनही अद्याप पालिका शाळांमधील शिक्षणाचा दर्जा वाढविण्याची गरज.
  8. गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेले गारागाई- पिंजाळ आणि इतर धरणाचे प्रकल्प तसेच महत्वाकांक्षी कोस्टल रोडचा प्रकल्प पूर्ण करण्याचे आव्हान.
  • प्रभाग/वॉर्डच्या सीमारेषा बद्दलल्या असल्या तरीही वॉर्डच्या संख्येत (227) बदल नाही.

■ पुणे

  • स्थापना : 15 फेब्रुवारी 1950
  • लोकसंख्या : अंदाजे 35 लाख
  • सदस्य संख्या : 152
  • सत्ताधारी पक्ष : राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडी
  • महापौर : प्रशांत जगताप - राष्ट्रवादी कॉंग्रेस
  • उपमहापौर : मुकारी अलगुडे - कॉंग्रेस
  • पक्षीय बलाबल :
  • कॉंग्रेस : 28
  • राष्ट्रवादी कॉंग्रेस : 51
  • भारतीय जनता पक्ष : 26
  • शिवसेना : 15
  • मनसे : 29
  • अन्य : 2
  • अपक्ष : 1
  • महापालिकेसमोरील महत्त्वाचे प्रश्न :
  1. शहराची वाहतूक, सार्वजनिक वाहतूकीचा उडालेला बोजवारा
  2. कचरा निर्मूलन
  3. नागरिकांना चोवीस तास पाणी
  4. विकास आराखड्याची अंमलबजावणी
  • प्रभाग/वॉर्ड रचना बददली; होणारी निवडणूक 162 जागांसाठी आहे

■ अकोला

  • स्थापना : 1 ऑक्‍टोबर 2001
  • लोकसंख्या : 6,25,000
  • सदस्य संख्या : 73
  • सत्ताधारी पक्ष : भाजप-शिवसेना
  • महापौर : उज्वला देशमुख (भाजप)
  • उपमहापौर : विनोद मापारी (शिवसेना)
  • पक्षीय बलाबल :
  • कॉंग्रेस : 18
  • राष्ट्रवादी कॉंग्रेस : 5
  • भारतीय जनता पक्ष : 18
  • शिवसेना : 8
  • मनसे : 0
  • भारिप बमसं : 6
  • अन्य पक्ष व अपक्ष : 18
  • महापालिकेसमोरील महत्त्वाचे प्रश्नः
  1. शहराची वाहतूक, सार्वजनिक वाहतूकीचा उडालेला बोजवारा
  2. कचरा निर्मूलन
  3. नागरिकांना चोवीस तास पाणी
  4. विकास आराखड्याची अंमलबजावणी
  5. रस्ताची समस्या
  6. हद्दवाढीत समाविष्ठ 24 गावांतील नागरी समस्या
  • अकोला महापालिकेची नुकतीच हद्दवाढ झाली असून, 24 गावांचा महापालिकेत समावेश झाला आहे. नवीन प्रभाग रचनेनुसार 20 प्रभागातुन 80 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत.

■ नाशिक

  • स्थापना : 7 नोव्हेंबर, 1987
  • लोकसंख्या : 13.61 लाख
  • सदस्य संख्या : 122
  • सत्ताधारी पक्ष : मनसे-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडी
  • महापौर : अशोक मुर्तडक, मनसे
  • उपमहापौर : गुरमितसिंग बग्गा - अपक्ष
  • पक्षीय बलाबल :
  • कॉंग्रेस : 14 (5 पक्षांतर)
  • राष्ट्रवादी कॉंग्रेस : 20 (5 पक्षांतर )
  • भारतीय जनता पक्ष : 17 (12 प्रवेश)
  • शिवसेना : 22 (16 प्रवेश)
  • मनसे : 40 (27 पक्षांतर)
  • अपक्ष : 6 (2 पक्षांतर)
  • माकप : 3 (1 पक्षांतर)
  • महापालिकेसमोरील महत्त्वाचे प्रश्न
  1. गोदावरी प्रदूषण, स्वच्छ गोदावरीसाठी हरीत लवादाची सुनावणी
  2. बंद पडलेला खत प्रकल्प सुरू करणे
  3. मुकणे धरणातून पाणीपुरवठा योजना सुरू करणे
  4. विकास आराखड्याची अंमलबजावणी, रहिवासी क्षेत्र दुप्पट झाल्याने सुविधांसाठी निधी उभारणे
  5. हद्दवाढ अपेक्षीत असल्याने विकासावरील ताण
  6. जेएनएनयुआरएमअंतर्गत रेंगाळलेल्या झोपडपट्टी पुर्नवषनच्या इमारती पूर्ण करणे व लाभार्थी पुर्नवसन.
  7. वाहनतळ, वाहतूक समस्या.
  • प्रभाग/वॉर्ड रचना बददली; होणारी निवडणूक 122 जागांसाठी आहे

उल्हासनगर

  • स्थापना : 1996
  • लोकसंख्या : 5 लाख 6 हजार 98
  • सदस्य संख्या : 78
  • सत्ताधारी पक्ष : शिवसेना, भाजप, रिपाई, अपक्ष
  • महापौर : अपेक्षा विकास पाटिल (शिवसेना)
  • उपमहापौर : पंचशिला नाना पवार (रिपाई)
  • पक्षीय बलाबल :
  • कॉंग्रेस : 08
  • राष्ट्रवादी कॉंग्रेस : 20
  • भारतीय जनता पक्ष : 11
  • शिवसेना : 19
  • मनसे : 01
  • रिपाई : 04
  • साई : 07
  • बसप : 02
  • अपक्ष : 06
  • चार सदस्यीय प्रभाग एकूण 20 प्रभाग 78 जागेसाठी निवडणूक होणार आहे
  • महापालिकेसमोरील महत्त्वाचे प्रश्नः

1) पाणी समस्या, कचरा
2) डपिंग ग्राउंड समस्या, वाहतूक कोंडी
3) अनधिकृत बांधकाम

सोलापूर

  • स्थापनाः 1 मे 1964
  • लोकसंख्याः 9.51 लाख
  • सदस्य संख्याः 102
  • सत्ताधारी पक्षः कॉंग्रेस व राष्ट्रवादी
  • महापौरः नाव - प्रा सुशीला आबुटे (कॉंग्रेस)
  • उपमहापौरः नाव - प्रवीण डोंगरे (राष्ट्रवादी)
  • पक्षीय बलाबलः
  • कॉंग्रेस - 43
  • राष्ट्रवादी कॉंग्रेस - 16
  • भारतीय जनता पक्ष - 26
  • शिवसेना - 09
  • बसप - 03
  • माकप - 03
  • आरपीआय - 01
  • अपक्ष - 01
  • महापालिकेसमोरील महत्त्वाचे प्रश्नः

1. शहराची वाहतूक, सार्वजनिक वाहतूकीचा उडालेला बोजवारा
2. कचरा निर्मूलनाचा प्रश्‍न
3. नागरिकांना चोवीस तास पाणी उपलब्ध होत नाही.
4. विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्याची गरज.
5. हद्दवाढ भागात ड्रेनेजची समस्या

पिंपरी चिंचवड

  • स्थापना - 11 ऑक्‍टोबर, 1982
  • लोकसंख्या -- सुमारे 17 लाख
  • एकूण जागा - 128 (2012 ची निवडणूक)
  • सत्ताधारी पक्ष - राष्ट्रवादी कॉंग्रेस
  • महापौर - शकुंतला धराडे
  • पक्षीय बलाबल
  • राष्ट्रवादी कॉंग्रेस - 83
  • कॉंग्रेस - 14
  • शिवसेना - 14
  • भाजप - 3
  • मनसे - 4
  • अन्य - 1
  • अपक्ष - 9
  • महत्त्वाचे प्रश्न
  1. अनधिकृत बांधकामे
  2. रेड झोन मधील बांधकामे
  3. पाणीपुरवठा
  4. सार्वजनिक वाहतूक

ठाणे

  • स्थापना : 1 ऑक्टोबर 1982
  • लोकसंख्या : सुमारे 20 लाख
  • सदस्य संख्या : 130
  • सत्ताधारी पक्ष : शिवसेना-भाजप युती
  • महापौर : संजय मोरे (शिवसेना)
  • उपमहापौर : राजेंद्र साप्ते (शिवसेना)
  • पक्षीय बलाबलः
  • शिवसेना : 56
  • भारतीय जनता पक्ष : 08
  • राष्ट्रवादी काँग्रेस : 34
  • काँग्रेस : 15
  • मनसे : 07
  • बहुजन समाज पक्ष : 02
  • आरपीआय (आठवले गट) : 01
  • अन्य : 07
  • महापालिकेसमोरील महत्त्वाचे प्रश्न :
  1. शहराचा क्लस्टर डेवलपमेंट प्लॅन न्यायालयाच्या कचाटयात सापडलाय, अजून प्रत्यक्ष अंमलबजावणी नाही.
  2. कळवा खाडीतील प्रदुषणाचा प्रश्न गंभीर
  3. अनधिकृत बांधकामांची समस्या ऐरणीवर
  4. शहराच्या सार्वजनिक वाहतूकीचा प्रश्न
  5. कचरा निर्मूलन
  6. पाण्याची सुविधा चांगली परंतू चोवीस तास पाणी नाही
  • प्रभाग/वॉर्डच्या सीमा बदलल्या पण वॉर्ड संखेत बदल नाही : वॉर्ड 130

अमरावती

  • स्थापना: 15 ऑगस्ट 1983
  • लोकसंख्या: सुमारे 6 लाख 47 हजार
  • सदस्य संख्या: 87
  • सत्ताधारी पक्ष: कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस
  • महापौर: सौ. चरणजित कौर विक्रमजीतसिंग नंदा
  • उपमहापौर: शेख जफर शेख जब्बार
  • पक्षीय बलाबल
  • शिवसेना : 11
  • राष्ट्रवादी कॉंग्रेस: 18
  • कॉंग्रेस: 25
  • बहुजन समाज पक्ष: 6
  • जन विकास कॉंग्रेस: 06
  • जन विकास आघाडी: 07
  • आरपीआय -ए : 2
  • आरपीआय जी: 01
  • इतर : 04
  • एकूण 87
  • महापालिकेसमोरील महत्त्वाचे प्रश्‍न
  1. गटार योजना 18 वर्षांपासून प्रलंबित
  2. सर्वत्र खुली गटारे
  3. अरुंद रस्ते
  4. सार्वजनिक स्वच्छतेची वानवा
  5. महिलांसाठी एकही स्वच्छतागृह नाही

नागपूर

  • स्थापनाः मार्च 1951
  • लोकसंख्याः सुमारे 22 लाख
  • सदस्य संख्याः 145 (+ पाच स्विकृत)
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे "होमटाउन'
  • महापालिकेत दहा वर्षे भाजप सत्तेत; यंदा स्वबळाचे वेध
  • काँग्रेस बड्या नेत्यांच्या गटबाजीने पोखरलेली
  • नवीन प्रभागरचनेमुळे नागपूर मनपा 38 प्रभागातून निवडून येणारे 151 सदस्य व पाच स्वीकृत सदस्य अशी 156 सदस्यांची होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com