

Damaged pickup vehicle and bus at the accident site where cotton farm workers were struck during early morning harvest travel.
esakal
Jafrabad Road Accident : कापूस वेचण्यासाठी मजुरांना घेऊन जाणारा पिकअप मागे वळवत असताना मागून येणाऱ्या भरधाव बसने त्याला जोरदार धडक दिली. या अपघातात पिकअपमधील दोन महिला जागीच ठार झाल्या, तर सहा मजुर जखमी झाले आहेत. ही घटना जाफराबाद मार्गावर श्री व्यंकटेश जिनिंगजवळ आज सकाळी सातच्या सुमारास घडली. मृत व जखमी महिला मजूर अमरावती व मध्य प्रदेशातील बुरहानपुर येथील आहेत.
प्राप्त माहितीनुसार, अमरावती आणि मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील मजूर स्थानिक श्री व्यंकटेश जिनिंगमध्ये मजुरीसाठी आलेले होते. यातील काही महिला कापूस वेचण्यासाठी पिकअप क्रमांक एम एच ३८ ई २०८२ बसल्या होत्या. पिकअप चालकाने वाहन मागे वळविले असता, जाफराबाद येथून देऊळगाव राजाकडे येणाऱ्या बस क्रमांक एम एच २० बी एल २२७६ ने मजुर बसलेले असलेल्या या पिकअपला मागून जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात रिचाय काल्या कासदेकर (वय ७२) रा.नांदुरी, तालुका धारणी जिल्हा अमरावती व मायाबाई सुरज काजळे (वय ३२) रा.रामाखेराकला ता.खगनर जि बुऱ्हानपूर या दोन्ही महिला मजूर जागीच ठार झाल्या. तर नर्मदा सोनू इवने (वय ४५), रोशनी मंगल इवने (वय २२), सुलोचना हेरसिंग सहरे (वय ३५), सुहाना प्रतिराम इव्हने (वय १६), सर्व राहणार नांदुरी जिल्हा अमरावती, खुशबू बबलू पालवी (वय १७) मु पो. ताजमली खगनर जिल्हा बुऱ्हानपूर व दमवता परमेश्वर खांडेभराड (वय ३१) रा. पिंपळगाव चिलमखा या जखमी झाल्या आहेत.
यातील गंभीर जखमी नर्मदा इवने व रोशनी मंगल इव्हने या दोघी महिला मजुरांना जालना येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघात घडल्यानंतर ग्रामीण रुग्णालयातील १०८ ॲम्बुलन्स चे डॉक्टर अक्षय गुठे, यांच्या सह सहकारी कर्मचाऱ्यांनी तसेच खासगी ॲम्बुलन्स चालक आघाव यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत आणि जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. ठाणेदार ब्रह्मा गिरी, हेड कॉन्स्टेबल मोगल, कॉन्स्टेबल गोरे, सानप यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. अपघाता संदर्भात बस चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.