संजय पांडेंचा मुक्काम कोठडीतच; जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

Court dismissed the bail petition of Sanjay Pandey NSE phone tapping case
Court dismissed the bail petition of Sanjay Pandey NSE phone tapping case

नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना नॅशनल स्टॉक एक्स्चेंज फोन टॅपिंग प्रकरणी दिल्ली ईडीकडून अटक झाली असून त्यांची याप्रकरणात चौकशी सुरु आहे. दरम्यान, मंगळवारी त्यांना रोज अव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आलं होतं. कोर्टानं त्यांना १६ ऑगस्टपर्यंत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर पांडे यांच्यावतीनं जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला, दरम्यान आज कोर्टाने संजय पांडे यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे पांडे यांना कोठडीतच राहावे लागणार आहे. (NSE Phone Tapping Case)

संजय पांडे यांनी आपल्या अर्जात म्हटलं होतं की, आपण अनेक हायप्रोफाइल आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील प्रकरणांचा तपास केला आणि खटले चालवले तसेच त्वरित कार्यवाही देखील केल्या. एक वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून प्रामाणिकपणे केलेल्या कर्तव्याचा हा राजकीय सूड आहे. सन 2009 ते 2017 दरम्यान कथितरित्या घडलेल्या गुन्ह्याचा तपास 2022 मध्ये केला जात आहे. म्हणजेच या प्रकरणाच्या सुरुवातीच्या तेरा वर्षांनंतर आणि ते बंद झाल्यानंतर पाच वर्षांनी पुन्हा सुरु झाले. तेही मी माझं कार्यालय सोडल्यानंतर एका आठवड्याच्या आत या चौकशीला सुरुवात झाली, यावरुन हे प्रकरण राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे,.

Court dismissed the bail petition of Sanjay Pandey NSE phone tapping case
Oppo, Vivo अन् Xiaomi भारत सरकारच्या रडारावर, जाणून घ्या प्रकरण

संजय पांडेवर काय आरोप?

२०१० ते २०१५ या कालावधीत नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे सिक्युरिटी ऑडिट करण्याची जबाबदारी त्यांची कंपनी आय सिक्युरिटीवर सोपवण्यात आली होती, दरम्यान यादरम्यान नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये को लोकेशन घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी तपास यंत्रणांनी राष्ट्रीय शेअर बाजाराच्या तत्कालीन सीएमडी चित्रा रामकृष्णन आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक केली होती.

या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा नोंदवल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे सिक्युरिटी ऑडिटकरण्याच्या बदल्यात संजय पांडे यांच्या कंपनीला कोट्यवधी रुपये देण्यात आले, नंतर याच्या आडून नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या कर्मचाऱ्यांचे फोन टॅपिंग करण्यात आल्याचा आरोप आहे. अंमलबजावणी संचालनालयाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना निवृत्तीनंतर लगेच ३० जून रोजी चौकशीसाठी बोलावले होते.

Court dismissed the bail petition of Sanjay Pandey NSE phone tapping case
Patra Chawl Case : संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊतांना ईडीचा समन्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com