esakal | लस कुठे आहे? राज्यात 18-45 वयोगटातील लसीकरण खोळंबणार?

बोलून बातमी शोधा

null

सध्या दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला लशींच्या तुटवड्यामुळे अनेक ठिकाणी ब्रेक लागला आहे. त्यातच आता 1 मेपासून 18 वर्षावरील सर्वांना लस देण्याची घोषणा केंद्राने केली.

लस कुठे आहे? राज्यात 18-45 वयोगटातील लसीकरण खोळंबणार?

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

मुंबई - कोरोला रोखण्यासाठी देशात लसीकरण मोहिम सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत दोन टप्प्यात लसीकरण झाले. तिसऱ्या टप्प्यात लसीकऱणासाठीची वयोमर्यादा कमी करून ती 18 वर्षे इतकी केली. मात्र केंद्राने लसीकरणाची जबाबदारी राज्य सरकारवर टाकली आहे. सध्या दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला लशींच्या तुटवड्यामुळे अनेक ठिकाणी ब्रेक लागला आहे. त्यातच आता 1 मेपासून 18 वर्षावरील सर्वांना लस देण्याची घोषणा केंद्राने केली. एकीकडे लशीच्या तुटवड्यामुळे लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ आली आहे तर दुसरीकडे व्यापक अशी मोहिम सुरु होतेय. लशीचा पुरेसा साठा, पुरवठा होत नसताना लसीकरण मोहिम कशी राबवायची असा प्रश्न राज्यासमोर सध्या आहे.

राष्ट्रीय लसीकरण मोहिमेची समीक्षा आणि लशींचा तुटवडा भासत असल्यानं 18 वर्षांवरील व्यक्तींसाठी लस देण्यामध्ये अडथळा येऊ शकतो. जोपर्यंत राज्यांना किंवा खासगी रुग्णालयांना लस उत्पादन करणाऱ्या कंपन्यांकडून थेट लस घेता येणार नाही तोपर्यंत 18 ते 45 वयादरम्यानच्या लोकांना लस देणं कठीण होऊ शकतं अशी माहिती आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. काँग्रेसची सत्ता असलेली राज्ये ही 18 ते 45 या वयोगटाला लस देण्याचा कार्यक्रम राबवता येणार नाही, अशी भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्रावरही अशी वेळ तर येणार नाही ना, असा प्रश्न एका वरीष्ठ सनदी अधिकाऱ्याने उपस्थित केला आहे.

हेही वाचा: Lockdown वाढणार की संपणार? मंत्री छगन भुजबळ म्हणतात...

भारत बायोटेक 85 लाख डोस देणार

हैदराबादमधील भारत बायोटेक कंपनीने महाराष्ट्र सरकारला 85 लाख डोस देण्याची तयारी दर्शवली आहे. येत्या मे महिन्यात 18 ते 45 वयोगटातील लोकांना लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी भारत बायोटेक मे महिन्यात सुरू होणाऱ्या लसीकरण मोहिमेसाठी 5 लाख डोस देणार असून उर्वरित डोस पुढील 6 महिन्यांच्या कालावधीत देणार आहे. यासाठी प्रति डोस 600 रुपये आणि त्यावर 5 टक्के करही आकारला जाणार आहे.

राज्यात 66 हजार नवे रुग्ण

गेल्या 24 तासांत राज्यात 66 हजार 358 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर 67 हजार 752 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मंगळवारी 895 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सोमवारी राज्यात 48 हजारांच्या जवळपास कोरोना रुग्ण सापडले होते. सर्वसाधारणपणे राज्यात 60 हजारांच्या पुढे कोविड रुग्ण सापडत आहेत.