esakal | Lockdown वाढणार की संपणार? मंत्री छगन भुजबळ म्हणतात...

बोलून बातमी शोधा

 Guardian Minister Bhujbal
Lockdown वाढणार की संपणार? मंत्री छगन भुजबळ म्हणतात...
sakal_logo
By
विराज भागवत

राज्यात सध्या कोरोनाचं संकट फार मोठं आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात विविध उपाययोजना केल्या जात आहेत. राज्यात १ मे पर्यंत लॉकडाउन लावण्यात आला आहे. कडक निर्बंधांच्या मदतीने सध्या कोरोनाला आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचा काहीसा सकारात्मक परिणामदेखील दिसतोय. त्यामुळे राज्यातील लॉकडाउन वाढणार का? अशी चर्चा सुरू आहे. त्याबाबत आज राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी मत व्यक्त केलं.

हेही वाचा: "भारताला आता महाराष्ट्र मॉडेल राबवण्याची गरज"

"लॉकडाउनचा कालावधी वाढला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. मी नाशिक जिल्ह्यावरून सांगतो की माझ्या जिल्ह्यातील रूग्ण संख्या लॉकडाउन मध्ये कमी झाल्याचं मला दिसलं. नाशिक मोठा जिल्हा आहे. तेथील परिस्थिती आता नियंत्रणात येऊ लागली आहे. अशा एका जिल्ह्याप्रमाणे राज्यातील कोविड रूग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी झाल्याचं स्पष्ट दिसून आलं आहे. त्यामुळेच राज्यातील लॉकडाउन वाढावा असं माझं स्पष्ट मत आहे, असं राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी एबीपीमाझाशी बोलताना सांगितलं.

हेही वाचा: मुंबईच्या राजकारणातील जायंट किलर एकनाथ गायकवाड यांचे कोरोनाने निधन

"लॉकडाउन वाढवण्यात आला तर तो १० दिवसांचा असावा की १५ दिवसांचा ते मंत्रिमंडळाने ठरवावं. कारण लॉकडाउन कोणालाही आवडत नाही. मी स्वत:देखील लॉकडाउनच्या विरोधात आहे. पण राज्यातील स्थिती पाहता पर्याय नसल्याने काही निर्णय घ्यावे लागतात. अनेक ठिकाणी बेड्स संपलेत. ऑक्सिजन अपुरा पडतोय. रेमडेसिवीरचा पुरवठा कमी होतोय. अशा पद्धतीनेच सगळं सुरू राहिलं तर लॉकडाउन करून साखळी खंडित करणे हाच एक पर्याय आहे. आणि त्या जोडीने योग्य प्रकारे १०० टक्के लसीकरण हा पर्याय आहे", असं ते म्हणाले.