राज्यात नवीन शैक्षणिक धोरण लवकरच होणार लागू; उदय सामंत

‘राज्यात लवकरच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
Uday Samant
Uday Samantsakal media

पुणे - ‘राज्यात लवकरच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या धोरणाचा अभ्यास करण्यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीने राज्य सरकारला शिफारशींचा अहवाल दिला आहे. त्यानुसार लवकरच राज्यात नवीन शैक्षणिक धोरण तयार करण्यात येईल. येत्या हिवाळी अधिवेशनात हे धोरण मांडण्यात येईल,’’ असा सूतोवाच राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केला.

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न शैक्षणिक संकुलातील नवीन इमारतीचे उद्‌घाटन सामंत यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. यावेळी सामंत बोलत होते. या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, सोसायटीचे अध्यक्ष विघ्नहरी महाराज देव, कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, कार्यवाह शामकांत देशमुख, सरकार्यवाह ज्योत्स्ना एकबोटे, सुरेश तोडकर उपस्थित होते. सामंत म्हणाले,‘‘राज्यात नवीन शैक्षणिक धोरण आखण्यात येत असून त्याची तीन टप्प्यात अंमलबजावणी करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात पायाभूत सुविधांच्या आधारे देशात प्रगतशील विद्यार्थी नावारूपाला येतील, यावर भर असेल. दुसऱ्या टप्प्यात शैक्षणिक संस्थांना अधिक सुविधा पुरवून बळ दिले जाईल. तर तिसऱ्या टप्प्यात शिक्षण संस्था आणि शासन एकत्रित प्रयत्नातून शिक्षण व्यवस्थेला चालना दिली जाईल.’’

Uday Samant
सरकारी अधिकाऱ्याला धमकी; विखेंनी केली नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी

‘महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६’ यामध्ये सुधारणा सुचविण्यासाठी डॉ. सुखदेव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली. परंतु यामुळे समितीमुळे कुलपती, कुलगुरू यांच्या अधिकारांवर गदा येणार, असा चुकीचा समज पसरविण्यात आला. परंतु असे काही होणार नाही. कुलपती, कुलगुरू यांचे सर्व अधिकार कायम राहतील, असेही सामंत यांनी स्पष्ट केले. राज्यात रत्नागिरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांवर संशोधन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन केंद्र साकारण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

...तर उद्योगांवर गुन्हे दाखल करू : उदय सामंत

‘‘कोरोना काळात परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यास सांगण्यात आले होते. परंतु ‘कोरोना बॅच’ असा अपप्रचार करण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड निर्माण होत आहे. पण कोरोना काळात परीक्षा दिल्यामुळे विद्यार्थ्यांना एखाद्या उद्योगाने नोकरीवर घेतले नाही, असा प्रकार समोर आल्यास तो उद्योजक कितीही मोठा असो, त्यावर गुन्हा दाखल केला जाईल.’’

- उदय सामंत, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com