Video : खुशखबर! पुण्यात शोधलाय डिझेल आणि LPGला पर्याय

Creating something as a new fuel ally for diesel gas
Creating something as a new fuel ally for diesel gas

पुणे : मानवाची ऊर्जेची गरज भागविण्या-साठी संपूर्ण जग स्वच्छ इंधनाचा पर्याय शोधत आहे. असे असतानाच पारंपरिक ऊर्जा स्रोत असलेल्या डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅससाठी (एलपीजी) सहयोगी इंधन म्हणून ‘डायमिथिल इथर’ची (डीएमई) निर्मिती करण्यात राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (एनसीएल) संशोधकांना यश आले आहे. ‘एनसीएल’मधील उत्प्रेरक विभागातील शास्त्रज्ञ डॉ. टी. राजा यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या चमूने ही कामगिरी केली आहे.

स्वच्छ आणि प्रदूषण न करणारे इंधन म्हणून ‘डायमिथिल इथर’ ओळखले जाते. डिझेलमध्ये ४० टक्के आणि स्वयंपाकगृहातील गॅसमध्ये २० टक्के ‘डायमिथिल इथर’ वापरता येऊ शकतो. यामुळे इंधनाची २० टक्के बचत होईल आणि त्याचबरोबर २० टक्के कार्बन उत्सर्जनाला आळा बसेल, अशी माहिती डॉ. राजा यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘चीनपेक्षाही जास्त म्हणजे २.३ दशलक्ष टन ‘एलपीजी’ आपण आयात करतो. यामुळे देशाचा पैसा बाहेर जातो आणि त्याचबरोबर इंधनाच्या बाबतीत आपली स्वयंपूर्णता नष्ट होते. याला पर्याय म्हणून यापैकी २० टक्के इंधन देशातच तयार करण्यासाठी आम्ही हा प्रकल्प हाती घेतला. माझ्या प्रयोगशाळेतील संशोधक विद्यार्थ्यांच्या सहयोगाने एका वर्षात आम्ही ज्वलनशील ‘डायमिथिल इथर’चा शोध पूर्ण केला.’’

डॉ. राजा आणि त्यांच्या चमूने यासाठी उत्प्रेरकही (कॅटॅलिस्ट) निर्माण केला असून, त्याच्या ‘पेटंट’साठी अर्ज करण्यात आला आहे. तसेच, डायमिथिल इथर, त्याची कार्यप्रणाली आणि यासाठी लागणारी गॅसची शेगडी यांच्या पेटंटसाठी अर्ज करण्यात आला आहे. याचबरोबर औद्योगिक उत्पादनासाठी पाच कंपन्यांसोबत करार करण्यात आला आहे. ‘एनसीएल’मध्ये प्रायोगिक तत्त्वावर उत्प्रेरकाची आणि शुद्ध ‘डायमिथिल इथर’ची निर्मिती सुरू करण्यात आली आहे. या संशोधनात विपुल पाटील, शिवा प्रसाद, निकिता गुप्ता, आकाश भटकर, किरण चव्हाण, अमरीन पुणेकर, स्नेहल तेली, कार्तिक राज आदींचा सहभाग आहे. 

पंकजा मुंडे यांच्यावर देवेंद्र फडणवीसांचे पहिल्यांदाच स्पष्टीकरण; म्हणाले...

पंतप्रधान उज्ज्वला योजना आणि सागरमाला योजनेसाठी आवश्‍यक इंधन पूर्तता याद्वारे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सामान्य माणसाला उच्च ज्वलनशील इंधनाचा पर्याय उपलब्ध होत असून, याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होणे आवश्‍यक आहे.
- डॉ. टी. राजा, वैज्ञानिक, एनसीएल 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com