Video:'रेप इन इंडिया' राजकारण तापले; लोकसभेत गदारोळ, स्मृती इराणी आक्रमक

lok sabha erupts over rahul gandhi rape in India remark smriti irani Locket Chatterjee
lok sabha erupts over rahul gandhi rape in India remark smriti irani Locket Chatterjee

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी झारखंडच्या एका जाहीर सभेत केलेल्या वक्तव्यावरून दिल्लीतलं राजकारण तापलंय. भाजपनं हा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला असून, इतिहासात पहिल्यांदाच गांधी कुटुंबातून अशा प्रकाराचं वक्तव्य झाल्याची टीका केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेत केली आहे. स्मृती इराणी यांच्यासह भाजपच्या सर्व महिला सदस्यांनी राहुल यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. 

काय आहे प्रकरण?
झारखंडमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशभरातील बलत्काराच्या घटनांचा मुद्दा उपस्थित करून पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवली. गोड्डा येथेही जाहीर सभा झाली होती. त्यानंतर राहुल गांधी यांच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडियाची घोषणा केली होती. पण, सध्या आपल्या देशात फक्त रेप इन इंडिया दिसत आहे, असे सांगत राहुल म्हणाले, 'देशात प्रत्येक राज्यात बलात्काराच्या घटना घडत आहेत. भाजपच्या एका नेत्यानं तरुणीवर बलात्कार केला. त्यावेळी पंतप्रधान मोदी बोलले नाहीत. त्यानंतर त्या महिलेच्या कारला अपघात झाला. त्यानंतरही मोदी काही बोलले नाहीत. पंतप्रधान मोदी बेटी पढाओ, बेटी बचाओचा नारा देतात. पण, त्या बेटीला भाजपच्या आमदारांपासूनच बचाओ, हे मात्र त्यांनी सांगितलं नाही.'

लोकसभेत काय घडलं?
राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून लोकसभेत भाजप सदस्यांनी रान उठवलं. त्यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि भाजपच्या सदस्य लोकेत चटर्जी यांनी सभागृहात आक्रमक भाषण करून, राहुल यांना घेरण्याचा प्रयत्न केला. 'रेप इन इंडिया' म्हणत, राहुल यांनी भारतातील महिलांवर बलात्कार करण्याचं जणू निमंत्रणच दिलंय, असा मुद्दा त्यांनी सभागृहात उपस्थित केला. राहुल गांधी यांचा हा देशातील जनतेला संदेश आहे का?, असा प्रश्न स्मृती इराणी यांनी उपस्थित केला. तसेच महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचं राजकीय भांडवल केलं जात असल्याचंही स्मृती इराणी म्हणाल्या. 

यापूर्वीही राहुल गांधींची टीका
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यापूर्वीही बलात्कारांच्या घटनांवरून, केंद्र सरकारवर टीका केली होती. बलात्काराच्या घटनांमुळं जगभरात भारताची बदनामी होत आहे. भारताची ओळख ही बलात्कारांची जगाची राजधानी, अशी झाल्याची टीका राहुल यांनी केली होती. केरळमधील वायनाड या त्यांच्या लोकसभा मतदारसंघात झालेल्या जाहीर सभेत त्यांनी ही टीका केली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com