crime newsesakal
महाराष्ट्र बातम्या
Crime News: नवविवाहित सुनेला १५ दिवस खोलीत डांबलं, मित्रासोबत वारंवार अत्याचार; कलियुगी सासऱ्याचं संतापजनक कृत्य
Thane Crime : पीडित महिलेने तक्रार दाखल करताना म्हटले आहे की तिच्या ५२ वर्षीय सासऱ्याने आणि त्याच्या मित्राने तिच्यावर अत्याचार केला.जर कोणाला काही सांगितले तर तुझ्या आईवडिलांना मारुन टाकू अशी धमकी दिल्याने पीडिता घाबरली.
ठाण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका नवविवाहित महिलेवर तिच्या सासऱ्याने मित्रासह लैंगिक अत्याचार केला. कलियुगी सासऱ्याने तिला एका खोलीत १५ दिवस डांबून ठेवले. पीडित महिलेने कशीबशी स्वत:ची सुटका करुन आईवडिलांकडे पोहोचली. तिथून त्यांनी पोलिस स्टेशन गाठले.