गुन्हेगार अन्‌ बेशिस्त वाहनचालकांची खैर नाही! सोलापुरातील २० चौकातील सिग्नलवर आता ५-५ सीसीटीव्ही कॅमेरे, शहर पोलिसांचे महानगरपालिकेला पत्र, वाचा...

सोलापूर शहरात २० सिग्नल आहेत, त्यातील १० सिग्नल नव्याने बसविण्यात येत आहेत. सर्व सिग्नलच्या चौकात चार दिशांना प्रत्येकी एक आणि एक फिरता सीसीटीव्ही कॅमेरा, असे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने कॅमेऱ्यांची आवश्यकता असल्याचे पत्र सोलापूर शहर वाहतूक शाखेने महानगरपालिकेला दिले आहे.
solapur city

solapur city

sakal

Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहरात २० सिग्नल आहेत, त्यातील १० सिग्नल नव्याने बसविण्यात येत आहेत. सर्व सिग्नलच्या चौकात चार दिशांना प्रत्येकी एक आणि एक फिरता सीसीटीव्ही कॅमेरा, असे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने कॅमेऱ्यांची आवश्यकता असल्याचे पत्र सोलापूर शहर वाहतूक शाखेने महानगरपालिकेला दिले आहे. याशिवाय वाहतूक नियमनाच्या दृष्टीने इतरही कामे करावी लागणार असून त्यासाठी देखील वाहतूक पोलिसांनी निधी मागितला आहे.

सोलापूर शहरातून ये-जा करणाऱ्या सरासरी पाच लाख बेशिस्त वाहनांवर दरवर्षी दंडात्मक कारवाई होते. २० ते २२ कोटींचा दंड त्या वाहनचालकांना भरावा लागतो. यातील बहुतेक बेशिस्त वाहनांवरील कारवाई स्मार्ट सिटीतून शहरात बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारेच केली जाते. दुसरीकडे शहरातील गुन्हेगारांना शोधण्यासाठी देखील या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा पोलिसांना मोठा आधार आहे. परंतु, अजूनही सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे पुरेशा प्रमाणात नाहीत.

या पार्श्वभूमीवर आता प्रत्येक सिग्नलच्या ठिकाणी पाच-पाच सीसीटीव्ही बसविण्याचा प्रस्ताव शहर वाहतूक पोलिसांनी महापालिकेला दिला आहे. शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज असून प्राधान्याने यासाठी निधी द्यावा, असेही पोलिसांनी महापालिकेला कळविले आहे.

महापालिकेशी पत्रव्यवहार

सोलापूर शहरातील वाहतूक नियमनासाठी जुने १० सिग्नल बदलून तेथे उंचीचे आणि चांगल्या दर्जाचे सिग्नल बसविले जात आहेत. त्यासाठी निधी मंजूर झाला आहे. आता शहरातील प्रत्येक सिग्नलवर पाच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केला आहे.

- सुधीर खिरडकर, सहायक पोलिस आयुक्त (वाहतूक), सोलापूर शहर

‘वन-वे’वर नाहीत फलक, रस्त्यांलगत नाहीत पांढरे पट्टे

सोलापूर शहरातील बहुतेक रस्त्यांलगत दोन्ही बाजूंना पांढरे पट्टे नाहीत. सिग्नलवरील झेब्रा क्रॉसिंगवरील पांढरे पट्टे पुसट झाले आहेत. ‘वन-वे’ असताना देखील त्याचे फलक दिसत नाहीत. वेग मर्यादेचे पण फलक नाहीत. शहराअंतर्गत रस्त्यांवर शेकडो गतिरोधक आहेत. अनेकदा गतिरोधक न दिसल्याने त्यावरून पडून काहींना जीव गमवावा लागला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. त्या गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारलेले नाहीत. त्यासाठी निधीची गरज असल्याचेही वाहतूक पोलिसांनी महानगरपालिकेला कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com