CM शिंदे यांनी भविष्य पाहिल्याच्या चर्चेनंतर अंनिसकडून टीकास्त्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde

CM शिंदे यांनी भविष्य पाहिल्याच्या चर्चेनंतर अंनिसकडून टीकास्त्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल (बुधवारी) सपत्नीक शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. त्यांनी यासाठी आपले सर्व कार्यक्रम रद्द केल्याचे सांगण्यात येते. तसेच साईदर्शनानंतर ते सिन्नरच्या मिरगावात गेले आणि तिथे एका ज्योतिषाकडून आपले भविष्य जाणून घेतल्याची चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडून याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला आहे. 'मुख्यमंत्री आज शिर्डी दौऱ्यावर असताना मिरगाव सिन्नरमधील एका ज्योतिषाकडे भविष्य पाहण्यासाठी गेल्याचं बोललं जातं आहे. हे खरं असल्यास ही अत्यंत बेजबाबदार कृती आहे. पुरोगामी महाराष्ट्रात संविधानिक पदावर असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या या कृतीचा जाहीर निषेध महाराष्ट्र अंनिस करते,' असे अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे म्हणालेत.

हे ही वाचा: Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

'ज्योतिष हे शास्त्र नसून थोतांड आहे. कुणी ते शास्त्र असल्याचं सिद्ध केलं तर आम्ही 21 लाख रुपयांचं बक्षीस ठेवलं आहे'. मुख्यमंत्र्यांच्या वर्तनातून चुकीचा संदेश गेला आहे,' असा आरोपही अनिंसने यावेळी केला आहे. 'थोतांड विषयाकडे संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने वळावं हे पूर्णपणे निषेधार्ह आहे. महाराष्ट्र अंनिस याचा निषेध करते,' असं महाराष्ट्र अंनिसचे प्रधान सचिव डॉ.टी.आर.गोराणे यांनी म्हंटलं आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी ज्योतिषाकडून आपले भविष्य पहिले का हा चर्चेचा विषय ठरला आहे.

हेही वाचा: Maharashtra Politics: शिंदे गटाची ताकद वाढणार? दलित पँथरचा मिळणार पाठिंबा