esakal | पवारांचा डान्स, भाजपचे "तांडव"! एकमेकांना नियमांची शिकवण
sakal

बोलून बातमी शोधा

rohit pawar atul bhatkhalkar

पवारांचा डान्स, भाजपचे "तांडव"! एकमेकांना नियमांची शिकवण

sakal_logo
By
अशोक निंबाळकर

अहमदनगर - कोविड सेंटरमध्ये आमदार रोहित पवार यांनी झिंगाट गाण्यावर डान्स केला होता. तो व्हिडिओ त्यांनीच आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला होता. यावरून महाराष्ट्राचे राजकारणात भाजपकडून तांडव सुरू आहे. त्यांच्या नेत्यांनी रोहित पवारांवर टीकास्त्र सोडले आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी रोहित पवारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय. तर अतुल भातखळकर यांनीही पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. (Criticism of Bhatkhalkars tweet from Rohit Pawar)

हेही वाचा: वाडीतली पोरं सगळ्यात म्होरं ः १६ फौजदार, १४ क्लासवन अधिकारी

या टीकेला रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून उत्तर दिलं आहे. नियमांची गोष्ट तुम्ही करू नका. आपल्या पायाखाली काय जळतंय ते बघा. उगीच कशाला नेहमीच कांदे सोलण्याचा प्रयत्न करता. यामुळं स्वतःचेच जास्त वांधे होतील. असं ट्विट करून भातखळकर यांना टॅग केलं आहे. त्यात त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय या तरूणाने कोरोनाची लस घेतल्यामुळे झालेल्या वादाचीही पोस्ट टॅग केली आहे. तुमच्याच पक्षातील नेत्यांचे नातेवाईक नियमभंग करीत आहेत. त्यामुळे तु्म्ही दुसऱ्यांना नियम शिकवू नका, असेच रोहित पवारांना भातखळकर यांना सांगायचे आहे.

रोहित पवार यांच्या डान्सवरून भातखळकर यांनी एक ट्विट केलं होतं. कोविड रूग्णांच्या नातेवाईकांना भेटण्याची परवानगी नाही. तुम्ही मात्र तेथे जाऊन डान्स करता, यासाठी परवानगी आहे का, असा सवाल करीत वडिलोपार्जित कंपनी चालविल्यासारखे सरकार चालवू नका. नियम सर्वांना सारखेच असल्याची आठवण करून दिली होती.

नेमका विषय काय आहे

रूग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी कर्जत तालुक्यातील गायकरवाडीच्या कोविड सेंटरमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. हे कोविड सेंटर रोहित पवार हेच स्व खर्चाने चालवित आहेत. तेथील रूग्णांना सुविधा मिळाव्यात यासाठी ते आपल्या बारामती अॅग्रो कंपनीच्या वतीने विविध साहित्य पुरवित आहेत. राष्ट्रवादी तसेच इतर लोकांकडूनही या कोविड सेंटरसाठी हात लावला जात आहे. तब्बल एक हजार बेडचे हे कोविड सेंटर आहे. रोहित पवार रूग्णांची चौकशी करीत होते. त्यावेळी गाण्याच्या कार्यक्रमात सैराटमधील गाणं लागलं. त्यावेळी तेथील रूग्ण त्यावर ताल धरू लागले. काहींनी रोहित पवार यांनाही आग्रह केला. त्यामुळे तेही एक-दोन मिनिट नाचले.(Criticism of Bhatkhalkar's tweet from Rohit Pawar)