"अशोक चव्हाणांची मजल २ जी, ३ जी अन्..." ; देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका | Devendra Fadnavis | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : "अशोक चव्हाणांची मजल २ जी, ३ जी अन्..." ; देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नांदेड दौऱ्यावर आहेत. भाजपने नांदेड येथे जाहीर सभा आयोजित केली आहे. या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, काँग्रेसला थोडस यश मिळाले की त्यांच्या डोक्यात हवा जाते. महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणणार म्हटले. मात्र मी त्यांना सांगतो महाराष्ट्रात एचच पॅटर्न आहे. तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.

देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर देखील टीका केली. अशोक चव्हाण यांची मजल २ जी, ३ जी आणि सोनियाजी इथंपर्यंत  आहे, असे फडणवीस म्हणाले.

मोदी लाट संपली असे शरद पवार बोलले मात्र मोटी लाट आजही आहे, उद्याही  राहणार, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

फडणवीस म्हणाले, नांदेड-जालना रस्त्याचे काम लवकर सुरू होणार आहे. ९ वर्षात नरेंद्र मोदी यांच्यामुळे महाराष्ट्राचा विकास झाला. आता ५ तासात नांदेडवरुन गोव्याला जाता येणार. नवीन शिक्तिपीठ महामार्ग तयार करण्यात येणार आहे.