esakal | कृषी निर्यातीसाठी पीकनिहाय क्लस्टर सेल; जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सुविधा
sakal

बोलून बातमी शोधा

Crop-wise-cluster-cell-for-agricultural-exports

कृषी निर्यातीसाठी पीकनिहाय क्लस्टर सेल

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : राज्याच्या कृषिनिर्यात धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी शेतमालनिहाय क्लस्टर सेल (Cluster cell) स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. शेतमालाचे अधिक उत्पादन असलेल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली क्लस्टर सुविधा कक्ष स्थापन करण्याचे गेल्या वर्षी ठरले होते.

नाशिकच्या फुले, बेदाणा, भाजीपाला, डाळी आणि कडधान्ये, तेलबिया, डाळिंब, केशर आंबा, द्राक्षे, कांदा, मांसजन्य पदार्थ यांचा क्लस्टरमध्ये समावेश केला आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी कांदा, द्राक्षे या पिकांच्या सुविधा कक्षाचे अध्यक्ष असतील. फुलांसाठी पुणे, बेदाण्यासाठी सांगली, भाजीपाल्यासाठी नगर, डाळी व कडधान्यांसाठी नागपूर, तेलबियांसाठी लातूर, डाळिंबासाठी सोलापूर, केशर आंब्यासाठी औरंगाबाद, मांसजन्य पदार्थांसाठी नागपूरचे जिल्हाधिकारी सुविधा कक्षाचे अध्यक्ष असतील.

सुविधा कक्षांचे अध्यक्ष असलेले जिल्हाधिकारी गरजेनुसार संबंधित पिकांचे उत्पादन घेतल्या जाणाऱ्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी अथवा अन्य निमंत्रितांना बैठकीसाठी बोलवतील अथवा त्यांच्याकडून लेखी अभिप्राय घेतील. जिल्हाधिकारी आणि सचिव राज्य कृषी पणनचे विभागीय उपसरव्यवस्थापक यांच्या समन्वयक म्हणून जिल्हा उपनिबंधक काम पाहतील. धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय नोडल एजन्सी (Nodal Agency) म्हणून पुण्याच्या महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाची नियुक्ती केली आहे.

हेही वाचा: ऑक्सिजन निर्मितीत राज्यात नाशिकचा प्रथम क्रमांक - छगन भुजबळ

हेही वाचा: नाशिक : 23 वर्षांपासून फरारी कैद्याचा तपास अखेर लागला

loading image
go to top