esakal | नाशिक : अहमदाबादचा 'फौजी' निघाला फरारी कैदी! 23 वर्षांनी लागला तपास
sakal

बोलून बातमी शोधा

crime

नाशिक : 23 वर्षांपासून फरारी कैद्याचा तपास अखेर लागला

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : नाशिक रोड येथील सप्टेंबर १९९२ मधील गाजलेल्या वैभव कटारे अपहरण व खून खटल्यातील शिक्षा झालेला, पण कारागृहातील पॅरोल मिळाल्यानंतर १९९८ पासून फरारी असलेला कैदी अखेर सापडला आहे. नाशिकच्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक श्‍यामराव भोसले व त्यांच्या पथकाने ही उकल केली.

'फौजी' निघाला फरारी कैदी

नाशिक रोडच्या बिटको रुग्णालयासमोरील परिसरातील दोन लाख रुपयांच्या खंडणीसाठी वैभव कटारे याचे अपहरण झाले होते. खंडणीची रक्कम येईपर्यंत अमानुष मारहाण करून त्याचा खून करण्यात आला होता. या खून प्रकरणी बिरजू गीज याच्यासोबत रवींद्र पांडे यांच्यासह पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा झाली. नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असताना, १८ फेब्रुवारी १९९८ ला रवींद्र पांडे १४ दिवसांच्या पेरोल रजेवर गेला होता. मात्र, नंतर परत आला नाही. पेरोल रजेवर असताना, फरारी झालेल्या रवींद्र मोगल पांडे याचा २३ वर्षांपासून पोलिसांकडून शोध सुरू होता. एवढ्या प्रदीर्घ काळात पांडे याला ओळखणाऱ्या त्यावेळचे बरेच पोलिस निवृत्त झाले. अनेकांच्या बदल्या झाल्यामुळे त्याचा शोध घेण्यात पोलिसांना अपयश येत होते.

हेही वाचा: बाप्पाची आरती अन् नमाज अजान! दोन्ही योग एकाच दिवशी

अहमदाबादला नाव बदलून २३ वर्षांपासून राहात होता.

दरम्यान, गुन्हे शोध शाखेतर्फे संजय बारकुंड, सहाय्यक आयुक्त नवलनाथ तांबे, निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक श्‍यामराव भोसले, हवालदार शंकर काळे, नंदकुमार नांदुर्डीकर आदींच्या पथकाने अहमदाबाद येथे दोन दिवस दशकोळी तालुक्यात पाळत ठेवली. तेथे नाव बदलून कुआ, दशकोळी (जि. अहमदाबाद) येथे तो राहात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्या फोटो व माहितीवरून शोधून काढले. त्याची विचारपूस करताना राजूदास रामदास जाधव ऊर्फ 'फौजी' असे असल्याचे नाव सांगून पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. तसेच खून प्रकरणाशी काही संबंध नसल्याचा दावा केला. मात्र, पोलिसांनी त्याचे पितळ उघडे पाडून तो रवींद्र पांडे असल्याचे कबूल करून त्याला नाशिकला आणले. कारागृहातील पॅरोल मिळाल्यानंतर १९९८ पासून फरारी असलेला रवींद्र मोगल पांडे याला शोधण्यात पोलिसांना यश आले. अहमदाबादला राजूभाई ऊर्फ फौजी म्हणून नाव बदलून तो २३ वर्षांपासून राहात होता.

हेही वाचा: पॅसेजर, शटलला ग्रीन सिग्नल कधी मिळणार? प्रवाशांची गैरसोय

loading image
go to top