मुंबई - राज्यात मागील चार दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने आठ लाख ५१ हजार ११० हेक्टर जमिनीवरील पिकांना फटका बसला आहे. यात नांदेड आणि वाशीम जिल्ह्यातील पिकाखालील क्षेत्र सर्वाधिक बाधित झाले आहे. पुरामुळे बाधित क्षेत्रावरील पिकांचे पंचनामेही रखडले आहेत..बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, अकोला, वर्धा, सोलापूर, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नांदेड, हिंगोली, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर आणि नाशिक या जिल्ह्यांतील ७८ तालुक्यांत मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.विशेषतः सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका, ज्वारी, बाजरी, ऊस, कांदा, हळद, भाजीपाला आणि फळ पिके जमीनदोस्त झाली आहेत. शेतामध्ये पाणी तुंबल्याने पंचनामा करण्यात अडथळे येत आहेत..कृषी विभागाच्या माहितीनुसार एक ते १८ ऑगस्टपर्यंत राज्यात सहा लाख ५३ हजार ८२० हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले होते. नांदेडमध्ये झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. अमरावती, नागपूर आणि अन्य भागामध्ये संत्री बागांचे नुकसान झाले आहे. वाशीम, हिंगोली आणि मानोरा तालुक्यात २४६ हेक्टर जमीन खरडून गेली आहे.यवतमाळ जिल्ह्यातील पुसद बाबुळगाव, मालेगाव, मोहगाव आणि यवतमाळ तालुक्यांमध्ये सोयाबीन, कापूस, तूर आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. अकोला, सोलापूर, हिंगोली जिल्ह्यातील विविध पिकांचे नुकसान झाले आहे..‘पंचनामे करून तातडीने अहवाल द्या’अतिवृष्टीमुळे पिके घरांची हानी किंवा अन्य प्रकारच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल पाठवावेत, असे निर्देश दिल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ते मंत्रालयात पत्रकारांशी बोलत होते.पवार यांनी मंत्रालयात राज्य आपत्कालीन कार्य केंद्रास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर तसेच राज्यातील अन्य प्रभावित जिल्ह्यांची त्यांनी माहिती घेतली..अतिवृष्टी प्राथमिक अंदाजानुसार बाधित क्षेत्र (हेक्टरमध्ये)नांदेड - २,८५५४३वाशीम - १,६४,५५७यवतमाळ - ८०, ९६९बुलडाणा - ७४,४०५अकोला - ४३,७०३सोलापूर - ४१,४७२हिंगोली - ४०,०००धाराशिव - २८,५००परभणी - २०,२२५अमरावती - १२,६५२जळगाव - १२,३२७जालना - ५१७८नाशिक - ४०३५छ. संभाजीनगर - २०७४बीड - १९२५वर्धा - ७७३लातूर - १०अहिल्यानगर - ३.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.