आरोग्यमंत्र्यांचे नवे ट्विट; महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या आता...

Current Count Of Corona virus Patients In Maharashtra Is 124
Current Count Of Corona virus Patients In Maharashtra Is 124

मुंबई : जगभर कोरोना वायरसच्या विषाणूंनी थैमान घातलेले असताना महाराष्ट्रातही हा विषाणू पसरायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या १२४ वर पोहचली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यांनी अशा प्रकारचे ट्विट त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून केले आहे.

नवी मुंबई आणि ठाण्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळल्याने करोनाग्रस्तांची संख्या १२४ वर पोहचली आहे. बुधवारपर्यंतही रुग्णसंख्या १२२ होती. आता दोन नवे रुग्ण आढळल्याने ही संख्या १२४ वर गेली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

कालही राजेश टोपे यांनी ट्विट करून महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या ११६वर गेली असल्याची माहिती दिली होती. महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या १०७ होती. त्यामध्ये ०९ची भर पडल्याचे ट्विट त्यांनी केले होते. काल (ता.२५) सांगली येथील एकाच कुटुंबातील पाच सदस्यांना संसर्गातून बाधा झाली. तर मुंबईतल्या चार व्यक्ती आहेत. त्यांना प्रवासामुळे संसर्ग झाल्या असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

कोरोना व्हायरसपासून दिवसेंदिवस धोका वाढत चाललेला आहे. जगभरात कोरोनामुळे 18 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. १७५ देशांमध्ये ०४ लाख २२ हजार ८२९हून अधिक रुग्ण सापडलेले असताना एक आशादायक गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे, जगभरातील जवळ जवळ १ लाख ०९ हजार १०२ लोक निरोगी झाले आहेत. ही आकडेवारी काल (ता.२६) जाहीर करण्यात आली आहे. यामुळे एक आशेचा किरण तयार झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com