मुंबई विमानतळावरून 5 किलो अंमली पदार्थ जप्त

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 जानेवारी 2017

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सीमाशुल्क विभागाने पाच किलोग्रॅम अंमली पदार्थ जप्त केले असून या प्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे.

मुंबईतून क्वाललंपूरच्या दिशेने निघालेल्या विमानातून रबीखान अब्दुलाह प्रवास करणार होता. दरम्यान सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने केलेल्या कारवाई करून रबीखानकडील पाच किलो अंमली पदार्थ जप्त केले. त्याच्याकडे 2 हजार 680 ग्रॅम मेटांफेटामाईन आणि 2 हजार 73 ग्रॅज्ञ इफेड्राईन असे एकूण 4 हजार 753 ग्रॅम अंमली पदार्थ सापडले आहेत. रबीखानला ताब्यात घेतले असून त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. पुढील तपास सुरू आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Customs seize five kg drugs from Mumabi Airport