Gold Smuggling: गुप्तांगात लपवलेलं 42 लाखांचं सोनं विमानतळावर पोहचताच जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Customs seizes gold worth Rs 42 lakh concealed in man rectum Telangana

Gold Smuggling : गुप्तांगात लपवलेलं 42 लाखांचं सोनं विमानतळावर पोहचताच जप्त

Gold Smuggling: हैदराबाद विमानतळावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. गुप्तांगात लपवून आणलेलं 42 लाखांचं सोनं जप्त करण्यात आलं आहे. (Customs seizes gold worth Rs 42 lakh concealed in man rectum Telangana )

हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवरुन सोन्याची तस्करी करणाऱ्या प्रवाशाला कस्टमच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. शुक्रवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली आहे. परदेशातून भारतामध्ये हे सोनं आणण्यात आले होते. (Latest Marathi News)

या सोन्याची किंमत तब्बल 42 लाख रुपये आहे. महत्वाचे म्हणजे या व्यक्तीने हे सोनं गुप्तांगात लपवून आणले होते.

कस्टम अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मस्तकवरुन हैदराबादमध्ये हा प्रवासी येत होता. पण हैदराबाद विमानतळावर उतरल्यानंतर तपासणी दरम्यान कस्टम अधिकाऱ्यांनी त्याच्याविरोधात ही कारवाई केली आहे या प्रवाशाकडे सोन्याची पेस्ट सापडली.

त्याने ही सोन्याची पेस्ट गुप्तांगामध्ये लपवली होती. अटक करण्यात आलेला हा प्रवासी मध्य प्रदेशमध्ये राहणारा आहे.(Marathi Tajya Batmya)

अटक करण्यात आलेल्या प्रवाशाने आपल्या गुदद्वारात सोन्याची पेस्ट असलेल्या दोन छोट्या आकाराच्या ट्यूब लपवल्या होत्या. कस्टम अधिकाऱ्यांच्या चौकशी दरम्यान हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. (Marathi Tajya Batmya)

कस्टम अधिकाऱ्यांनी याचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये दिसत आहे की, कस्टम अधिकारी या ट्यूब ब्लेडच्या सहाय्याने फाडून त्यामधील सोन्याची पेस्ट दाखवत आहेत.