आता कटिंग चहाही महागला! महागाईचा सर्वसामान्यांना झटका

चहा बनवण्याच्या पदार्थांचे दर वाढल्यानं गरीबांसाठीचा टपरीवरचा चहाही महागला आहे.
Tea
Tea
Updated on

मुंबई : कपभर प्यायलानं स्फूर्ती जागवणारा चहाही (Tea) आता महागला आहे. महागाईचा फटका या गरिबांच्या आणि सर्वसामान्यांच्या चहाला बसला आहे. चहा बनवण्याचे पदार्थ महागल्यानं टी-कॉफी असोसिएशननं (Tea-Coffee association) चहाच्या दरात दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता टपरीवरचा कटिंग चहाही दोन रुपयांनी महाग मिळणार आहे. (Cutting tea is now expensive Inflation hits the masses)

Tea
आयकरच्या रडारवर अनिल परब; निकटवर्तीयाच्या 26 मालमत्तेवर छापे

टी-कॉफ असोसिएशन चहाच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेताना सांगितलं की, दूध, साखर, चहा पावडर यांचे दर वाढले आहेत. त्याचबरोबर गॅसच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळं चहा आहे त्याच किंमतीत विकणंही आता हॉटेलचालकांना, चपरी चालकांना परवडेनासं झालं आहे. त्यामुळं चहाच्या दरात दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता १० रुपयांना मिळणारा चहा हा १२ रुपयांना मिळणार आहे.

Tea
मंत्रीपदं भोगताना तुमचा विचार कुठे होता? G23 वर संतापले अधीर रंजन चौधरी

दुधाच्या पॅकेजिंग खर्चात वाढ झाल्यानं प्लॅस्टिक पिशव्यांमधून घरोघरी मिळणाऱ्या दुधाच्या किंमतीत वाढ झाली आहे. यामध्ये महानंद, गोवर्धन, अमूल, मदर डेअरी, कात्रज, चितळे या सर्व दूध कंपन्यांनी आपल्या दूधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ केली आहे. काही दिवसांपूर्वी नस्लेने आपल्या मॅगी तसेच इन्संट चहा-कॉफीच्या दरात वाढ केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com