
देशभरात सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पुण्यात मात्र सायबर गुन्ह्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने सायबर फ्रॉड द्वारे एका ज्येष्ठ नागरिकाची ६ कोटींची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. हा सायबर भामटा सुनील तटकरे यांचा कार्यकर्ता असून त्याचे वडील तालुका उपाध्यक्ष आहेत तर पत्नीही राष्ट्रवादीची कार्यकर्ती असून गावची सरपंच आहे.