

Akvan Bay of Bengal Cyclone Update
esakal
Maharashtra Rain Alert : बंगालच्या उपसागरातील ‘अक्वान’ चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, उद्या (ता. १९) ते अतितीव्र चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी (ता. २०) दुपारपर्यंत हे वादळ आंध्र प्रदेशातील नेल्लोर आणि यानमदरम्यान किनारपट्टी ओलांडण्याचा अंदाज आहे. या वादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील विदर्भासह पूर्व भारतातील काही राज्यांत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.