

Cyclone Aquan Latest Update
esakal
Cyclone in Bay of Bengal : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘अक्वान’ चक्रीवादळ आज (ता. २०) दुपारपर्यंत ओडिशातील गोपाळपूरजवळ किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाने दिशा बदलल्याने महाराष्ट्रावरील त्याचा संभाव्य परिणाम टळला आहे. त्यामुळे विदर्भासह राज्याच्या कोणत्याही भागात या चक्रीवादळाचा विशेष प्रभाव जाणवणार नाही. दरम्यान, आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर मात्र जोरदार वारे आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.