Arabian Sea Cyclonic Winds : अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांमुळे पावसाची शक्यता; पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा

Maharashtra Rain Alert : अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांमुळे राज्यात पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात विजांसह वादळी पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज.
Maharashtra Rain Alert Arabian Sea Cyclonic Winds 

Maharashtra Rain Alert Arabian Sea Cyclonic Winds 

esakal

Updated on: 

Maharashtra Weather Rain Update : राज्यात एका बाजूला उन्हाचा चटका आणि उकाडा कायम असताना दुसरीकडे काही भागांत वादळी पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे कोकणासह पुणे, पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाड्यात विजांसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. आज (ता. १६) सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि धाराशिव या सहा जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, कोकणातील काही भागांत उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com