पुण्यात बालपुस्तक जत्रा कार्यक्रमात बोलताना राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी बालपुस्तक जत्रा कार्यक्रम जिल्हा निहाय करता येईल का याचा विचार करावा लागेल असं म्हटंलय. जुन्या खेळाची यातून माहिती दिली जातेय. मोठ्या संख्येनं लहान मुलं येतायत. प्रत्येक जिल्ह्यात हा कार्यक्रम राबवण्याचा विचार व्हायला हवा असं मत मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी हिंदीचा तिसरी भाषा म्हणून समावेश करण्याचा निर्णय स्थगित केला असल्याचंही सांगितलं. तर अकरावी प्रवेशाची प्रक्रिया तांत्रिक अडचणींमुळे थांबली होती ती सोमवारपासून सुरू होणार असल्याचं दादा भुसे म्हणाले.