
Maharashtra Politics : शरद पवारांच्या एकेरी उल्लेखावर दादा भुसेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, "मी एवढंच बोललो की…"
Latest Marathi News: शरद पवार यांच्याबद्दल दादा भुसे यांनी विधीमंडळात केलेल्या वक्तव्यामुळे आज विधानसभेत गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे दादा भुसेंच्या वक्तव्यावर चांगलेच भडकले होते. सभागृहातील गादारोळानंतर दादा भुसे यांनी त्यांच्या विधानाबद्दल स्पष्टीकरण दिलं.
अजित पवार संतापले..
दादा भुसे यांच्या विधानानंतर विरोधीपक्ष नेते अजित पवार चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळीले. अजित पवार म्हणाले की, अधिवेशन शांत पणे पार पाडण्याचा प्रयत्न आम्ही केला. मंत्र्यांना त्यांची मते मांडण्याचा अधिकार आहे.
पण दादा भुसे यांनी त्यांची भूमिका मांडत असताना राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख करण्याचं कारण नव्हतं. शरद पवार ५५ वर्षांपासून राजकारण करत आहेत. दादाजी तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुम्ही तुमचे शब्द मागे घ्या. दिलगीरी व्यक्त करा. आम्ही हा विषय संपवायला तयार आहोत.
हेही वाचा - झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच
दादा भुसेंचं स्पष्टीकरण..
दरम्यान या प्रकरणी दादा भुसे यांनी त्यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. दादा भुसे म्हणाले की, "तुम्ही रेकॉर्ड तपासून बघा मी मानणीय शरद पवार साहेबांच्याविषयी एकही ब्र शब्द चुकीचं बोललो नाही. मी एवढंच बोललो की हे जे महागद्दार आहेत ते भाकरी मातोश्रीची खातात आणि चाकरी मानणीय शरद पवार साहेब यांची करतात असं मी बोललो."
पुढे बोलताना दादा भुसे म्हणाले की, "विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी भावना व्यक्त केल्या. पण शरद पवार यांच्याबद्दल मी काहीही वाईट बोललेलो नाही . त्यांची चाकरी करतात एवढं बोललो आहे. मी जर शरद पवार यांच्याविषयी चुकीचं बोललो असेल तर अध्यक्षांनी तपासून योग्य तो निर्णय करावा" असे दादा भुसे यांनी स्पष्ट केलं.
दादा भुसे यांनी शरद पवारांचा एकेरी उल्लेख केला तो कामकाजातून काढून टाकावा अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी यावेळी केली. यानंतर सभागृहात गोंधळ चालूच होता.
काही दिवसांपूर्वी राम सातपुते यांनी देखील शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्यावरून गदारोळ झाला होता. दरम्यान आज मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राम सातपुतेंना झापल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी भाजपचे आमदार राम सातपुते यांना राम सातपुते प्रत्येक गोष्टीत बोलायची गरज नाही, तुम्ही बसून घ्या.
अध्यक्ष नार्वेकर काय म्हणाले..
मंत्री दादा भुसे यांनी नियम ४८ नियमानुसार वयक्तीक स्पष्टीकरण दिलं आहे जे नियमानुसार आहे. स्पष्टीकरण देताना त्यांनी ज्या व्यक्ती किंवा बाबींचा उल्लेख केला आहे.
त्याचं संपूर्ण रेकॉर्ड तपासेल आणि आज दिवसाचं कामकाज संपण्यापूर्वी जर त्यांनी एकेरी भाषेत कुठल्याही नेत्याबद्दल उल्लेख केला असेल तर तो रेकॉर्डमधून काढून टाकलं जाईल असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले.