
पेण : पेण तालुक्यातील दादर सागरी पोलीस ठाणे हद्दीतील खारपाडा येथे दि. २ जून ते ९ जून २०२५ या दरम्यान एका अट्टल चोरट्याने घरफोडी करून जवळपास ४ लाखांचा सोन्याचा माल लंपास केला होता. त्याचा तपास दादर सागरी पोलिसांनी केला असता यातील आरोपी गुड्डू हरेराम सिंग वय १९ यास अटक केली असून मुद्देमाल जप्त केला आहे.