उभं पिक आडवं झाल्याचं पाहून शेतकऱ्याने तोंडाला घेतलं मारून, Video Viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

damage crops farmer beaten himself sambhajinagar Heavy Rain

उभं पिक आडवं झाल्याचं पाहून शेतकऱ्याने तोंडाला घेतलं मारून, Video Viral

राज्यभरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकंट ओढावलं आहे. ऐन काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने बळीराजा हवालदील झाला आहे. आज दिवसभरात अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अशातच एका शेतकऱ्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो स्वतःला मारून घेताना दिसत आहे. (damage crops farmer beaten himself sambhajinagar Heavy Rain )

छत्रपती संभाजीनगरमध्ये एका शेतकऱ्याने उभं पिक आडवं झाल्याचं पाहून स्वतःला थोबाडीत मारुन घेत आहे. एका शेतकऱ्याने सकाळी बांधावर जाऊन पिकाची पाहणी केली असता शेतकऱ्याला अश्रु अनावर झाले आहेत. एवढ्या मेहनतीने पिकवले पिक पाण्यात वाहून गेली आहे.

पिकांची अवस्था पाहून स्वत:लाच शेतकऱ्याने शिक्षा दिली. आपल्या हाताने तोंडू झोडून काढत शेतकऱ्याने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार वाशीम जिल्ह्यात रात्री वाशीमसह कारंजा, मानोरा, रिसोड आणि तालुक्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आहे. या अवकाळी पावसामुळे रब्बीतील काढणीला आलेल्या गहू, हरभरा, पिकांसह भाजीपाला आणि संत्रा बागेच अतोनात नुकसान झाले आहे.

सोसाट्याचा वारा आणि अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडीत झाला. दरम्यान अवेळी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या पिकाच नुकसान झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.

टॅग्स :farmer news today