राजकीय फटाकेबाजीला सुरुवात : अनंत मोहिते यांच्या मुलीचा राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश : Dapoli | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनंत मोहिते यांच्या मुलीचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश

दापोली नगरपंचायातीची निवडणूक काही महिन्यांवर आलेली असताना राजकीय पक्षप्रवेशाचे कार्यक्रम जोरात सुरू आहेत.

दापोलीत खळबळ: अनंत मोहिते यांच्या मुलीचा राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश

sakal_logo
By
चंद्रशेखर जोशी

दाभोळ : दापोली तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनंत तथा भाऊ मोहिते (Anant Mohite) यांच्या मुलीने आज राष्ट्रवादीचे खा. सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या उपस्थितीत सुतारवाडी येथे राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केल्याने दापोलीत खळबळ उडाली. येत्या काही दिवसात असेच फटाके फुटण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमात शिवसेनेच्या दापोलीच्या नगराध्यक्षा परवीन शेख (Parvin Shekha) याही उपस्थित असल्याने, दापोली नगरपंचायत निवडणुकीत चांगलीच रंगत येणार आहे. या पक्ष प्रवेशामुळे दापोलीतील राजकारणात खळबळ उडाली.

दापोली नगरपंचायातीची निवडणूक काही महिन्यांवर आलेली असताना राजकीय पक्षप्रवेशाचे कार्यक्रम जोरात सुरू आहेत. राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन जाधव यांनी काही दिवसांपूर्वीच नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन शिवसेनेत पक्षप्रवेश केला होता. शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष संदीप राजपुरे यांनी राष्ट्रवादीत तर राष्ट्रवादीच्या माजी सभापती व पंचायत समिती सदस्य ममता शिंदे यांनी पंचायत समिती सदस्य पदाचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. निवडणूकीच्या तोंडावर असे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: पोलीस बळाचा वापर करणाऱ्यांना किंमत मोजावी लागेल ; राणेंचा इशारा

आज सुतारवाडी (जिल्हा रायगड) येथील खासदार सुनील तटकरे उपस्थितीत त्यांच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात काँग्रेसचे दापोली तालुकाध्यक्ष अनंत तथा भाऊ मोहिते यांची कन्या दीपाली मोहिते-पवार, शिवसेनेचे दापोली शहरातील वाहिद शेख, युवा सेनेचे आदिल शेख, सलमान मुजावर, वासिफ हजवानी यांनी राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेश केला.

दापोली नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 12, बुरुड आळी, बौद्धवाडी हा प्रभाग अनुसूचित जाती मधील महिलांसाठी आरक्षित झाला असून या प्रभागातून आता दीपाली मोहिते-पवार या निवडणूक लढवतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला दापोलीच्या नगराध्यक्षा परवीन शेख याही उपस्थित असल्याने दापोकीकरांच्या भुवया उंचावल्या आहेत. नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्यावर त्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला माजी आमदार संजय कदम, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस संदीप राजपुरे, जिल्हा सरचिटणीस विकास जाधव, नगरसेवक खालिद रखांगे आदी उपस्थित होते.

loading image
go to top