Dasara Melava : शिवतीर्थावरील सभा पवारांच्या ताटाखालचं मांजर म्हणायचं का? गोगावलेंचा सेनेवर निशाणा

शिवसेनेतील फुटीनंतर आज ठाकरे आणि शिंदे गटाच्या मेळाव्यांकडं राज्याचं लक्ष लागलं आहे.
Bharat Gogawale
Bharat Gogawaleesakal
Summary

शिवसेनेतील फुटीनंतर आज ठाकरे आणि शिंदे गटाच्या मेळाव्यांकडं राज्याचं लक्ष लागलं आहे.

Dasara Melava : शिवसेनेतील फुटीनंतर आज ठाकरे आणि शिंदे गटाच्या मेळाव्यांकडं राज्याचं लक्ष लागलं आहे. शिवसेनेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना अभूतपूर्व आव्हान देणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाकरेंना समांतर मेळावा भरवून मोठं आव्हान दिलं आहे. त्यामुळं यावेळचा त्यांचा मेळावाही ऐतिहासिक ठरणार आहे.

या मेळाव्यातील खास बाब म्हणजे, शिंदे गटाकडून व्यासपीठावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची खुर्ची राखीव ठेवण्यात आली आहे. तर, दुसरीकडं नेस्कोप्रमाणं शिवाजी पार्कवरील उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यात खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची खुर्ची ठेवण्यात आली आहे. खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाला नसल्यानं राऊत तुरुंगातच आहेत. शिवसेना संजय राऊत यांच्या पाठिशी ठाम असल्याचा संदेश यामागं देण्यात आला आहे. संजय राऊत हे आमचे नेते आहेत, त्यांचा सन्मान ठेवण्यासाठी आम्ही ही खुर्ची रिकामी ठेवली आहे, असं शिवसेनेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

Bharat Gogawale
Nana Patole : उद्धव ठाकरे संकटात असताना काँग्रेसनं घेतला मोठा निर्णय; 'या' निवडणुकीत सेनेला दिला पाठिंबा

संजय राऊतांच्या रिकाम्या खुर्चीवरुन शिंदे गटाचे प्रतोद आणि उपनेते भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय. गोगावले म्हणाले, दोन मेळावे करण्यासाठी उद्धव ठाकरेंनीच भाग पाडलं आहे. ते व्यवस्थित चालले असते तर अशी वेळ त्यांच्यावर आली नसती. आज बाळासाहेब ठाकरे आमच्यात नसल्यामुळं त्यांच्या खुर्चीला अभिवादन करुन आम्ही सभा सुरु करणार आहोत. हिंदू धर्मामध्ये जीवंत माणसाची खुर्ची खाली ठेवायची नसते, असा टोला त्यांनी राऊतांच्या रिकाम्या खुर्चीवरुन सेनेला लगावला. राऊतांची ती खुर्ची चुकीची असून आम्ही बाळासाहेबांची ठेवलेली खुर्ची योग्य आहे. त्यामुळं हयात असलेल्या माणसाच्या नावे खुर्ची ठेवायची नसते. मेळाव्यावरुन शिंदे गटावर टीका करणाऱ्यांना गोगावलेंनी उत्तर दिलंय. शिवतीर्थावरील सभा ही पवारांच्या ताटाखालचं मांजर म्हणायचं का? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

Bharat Gogawale
Telangana : राष्ट्रीय राजकारणात KCR यांची दमदार एन्ट्री; स्वत: च्या पक्षाचं नाव बदलून दिलं 'हे' नवं नाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com