Dasara Melava Shivaji Park Eknath Shinde Shiv Sena Chief Uddhav Thackeray
Dasara Melava Shivaji Park Eknath Shinde Shiv Sena Chief Uddhav Thackerayesakal

Dasara Melava: 'शिवाजी पार्क कोणालाच देऊ नका'; दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाची नवी रणनीती

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानाची रस्सीखेच सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपासून दसरा मेळाव्यावरून राज्याचं राजकीय वातावरण तापलं आहे. दसरा मेळाव्यात शिवसेना आणि शिंदे गट दोन्ही गट आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहेत. यावेळी दोन शिवसेना गट तयार झाल्याने दसरा मेळावा कोण घेणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.(Dasara Melava Shivaji Park Eknath Shinde Shiv Sena Chief Uddhav Thackeray)

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानाची रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान, शिवाजी पार्क कोणालाच देऊ नका अशी आक्रमक भूमिका शिंदे गटाने घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिवाजी पार्क फ्रिज होण्याची शक्यता अधिक वर्तवण्यात येत आहे.

Dasara Melava Shivaji Park Eknath Shinde Shiv Sena Chief Uddhav Thackeray
Thackeray vs Shinde : एकनाथ शिंदे गटाची नवी खेळी; सर्वोच्च न्यायालयामध्ये रिट याचिका दाखल

मनपानं परवानगी दिली तर त्यावा विरोध केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कोणालाच देऊ नका अशी भूमिकादेखील शिंदे गटाने घेतली असल्याचे म्हटलं आहे.

दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घ्यायचा आहे, तिथे मी सविस्तर बोलेन. आतापर्यंत मुख्यमंत्रिपदाचा मास्क असायचा, त्यामुळे बोलताना जपून बोलावे लागायचे. आता तसे नाही,’ असा थेट इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट व भाजपला दिला. मेळाव्यासाठी शिवतीर्थ आम्हाला द्यावे, असा अर्ज शिंदे गटाने मुंबई महापालिकेकडे केला आहे.

Dasara Melava Shivaji Park Eknath Shinde Shiv Sena Chief Uddhav Thackeray
BMC Election : आम्ही त्यांना अस्मान दाखवू; उद्धव यांचा भाजपवर हल्ला

तसेच, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ज्यांच्याबरोबर ४० आमदार त्यांचाच दसरा मेळावा शिवाजी पार्कवर व्हावा. अस त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे दसरा मेळावा सेनेचा की शिंदे गटाचा होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com