शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ; धनंजय मुंडे यांची माहिती |Dhananjay Munde | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhananjay munde
शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ; धनंजय मुंडे यांची माहिती

शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ; धनंजय मुंडे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कनिष्ठ, वरिष्ठ आदी महाविद्यालयांसोबत विविध प्रकारच्या व्यावसायिक पदवी, पदविका आदी अभ्यासक्रमांना शिकत असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास (Application for scholarship) पुन्हा एकदा मुदतवाढ (date extension) देण्यात आली आहे. भारत सरकारच्या (Indian government) पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप योजना 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी साठी अर्ज करणे व जुन्या अर्जाचे नूतनीकरण करणे यासाठी 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदत देण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांनी दिली आहे.

हेही वाचा: व्यवासायिक व्हिसाच्या नावाखाली तस्करी; ठाण्यात नायजेरियनला अटक

पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षण फी, परीक्षा शुल्क, देखभाल भत्ता आदींसाठी आर्थिक मदत केली जाते. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करण्याची प्रक्रिया आहे.

उच्च शिक्षणातील काही विषयायील प्रवेश प्रक्रिया व राउंड अजूनही सुरू असल्याने विद्यार्थ्यांना विहित वेळेत अर्ज करता यावा, याचा विचार करून विद्यार्थ्यांना पोस्ट मॅट्रिक साठी अर्ज करणे तसेच पूर्वीच्या अर्जाचे नूतनीकरण करणे यासाठी 15 फेब्रुवारी पर्यंत मुदत देण्यात आल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

Web Title: Date Extension Till Fifteen February For Scholarship Application As Minister Dhananjay Munde Gives Information

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top