
व्यवासायिक व्हिसाच्या नावाखाली तस्करी; ठाण्यात नायजेरियनला अटक
ठाणे : ठाण्यात अमली पदार्थांची विक्री (Drug selling crime) करण्यासाठी आलेल्या नायजेरियन नागरिकाला (Nigerian culprit arrested) ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट ५ ने बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून कोकेन व एमडी पावडर (cocain and md powder seized) असा एकूण १ कोटी १२ लाख रुपयांचे अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले. विशेष म्हणजे कपडे विक्रीच्या व्यवसायाखाली तो मुंबईत (mumbai) आल्याची माहिती पोलिसांनी दिली. डिस्कन इझे (वय ३०) असे आरोपीचे नाव असून तो व्यावसायिक व्हिसाच्या नावाखाली मुंबईत राहत होता.
हेही वाचा: मुंबई महापालिका निवडणूक एप्रिलमध्ये ?
घोडबंदर येथील आनंदनगर भागात अमली पदार्थ विक्रीसाठी एक व्यक्ती येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा युनिट पाचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती. पोलिस पथकाने सापळा रचून डिस्कन इझे या नायजेरियन नागरिकास ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून २७४ ग्रॅम कोकेन आणि ६० ग्रॅम मेफेड्रॉन आढळून आले. त्याच्याविरोधात कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली.
जप्त केलेल्या अमली पदार्थ हे १ कोटी १२ लाख रुपयांचे असल्याचे तपासात समोर आल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक मोराळे यांनी दिली. चौकट संपर्कात असलेल्यांचा कॉल तपशील प्राप्त डिस्कन याच्याकडे नायजेरियाचे पारपत्र आणि व्यवसाय व्हिसा आढळून आला. या व्यक्तीच्या संपर्कात असलेल्या ३० हून अधिक जणांचा कॉल तपशील पोलिसांना प्राप्त झाला असून किती जणांना त्याने अमली पदार्थ विक्री केले याचा तपास पोलिस करीत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..