मरेपर्यंत पवारसाहेबांची साथ सोडणार नाही; पण..; शशिकांत शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shashikant Shinde

'मी राष्ट्रवादीचा (NCP) सच्चा पाईक असून, मरेपर्यंत पवारसाहेबांची साथ सोडणार नाही.'

मरेपर्यंत पवारसाहेबांची साथ सोडणार नाही; पण..

सातारा : खासदार शरद पवार (MP Sharad Pawar) माझी नेहमीच समजूत काढतात, कारण पवार साहेब आहेत म्हणून मी आहे. आज (गुरुवारी) मी माझी भूमिका मांडणार असून, त्यामध्ये पुढील राजकीय वाटचालीबाबतचा निर्णय ही सांगणार आहे. मी राष्ट्रवादीचा (NCP) सच्चा पाईक असून, मरेपर्यंत पवारसाहेबांची साथ सोडणार नाही. आता मी मोकळाच आहे. त्यामुळे सातारा, जावळीसह सर्व तालुक्यांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी फिरणार असल्याचे आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांनी सांगितले. त्यामुळे शिंदे काय भूमिका घेणार याची आता उत्सुकता आहे.

हेही वाचा: NCP ला मोठा धक्का! शरद पवारांच्या निष्ठावंत आमदाराचा एका मतानं पराभव

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘मला तुम्हाला स्पष्ट सांगायचं आहे. आजच्या बैठकीत पवार साहेबांशी कोणतीही चर्चा झालेली नाही; पण जिल्हा बँकेतील निवडणुकीत माझ्याविषयी झालेल्या कुरघोड्यांविषयी मला जे बोलायचं आहे ते मी आज (ता. २५) पत्रकार परिषदेत बोलणार आहे. त्या वेळी मी माझ्या पुढील राजकीय वाटचाली विषयीचा निर्णयही जाहीर करेन.’’ त्यावर पत्रकारांनी त्यांना राष्ट्रवादीत राहूनच की दुसऱ्या कोणत्या पक्षात जाऊन असे विचारले. त्यावर आमदार शिंदेंनी ‘‘मी राष्ट्रवादीचा आणि पवार साहेबांचा सच्चा पाईक आहे. मरेपर्यंत पवार साहेबांना सोडणार नाही,’’ असे सांगितले.

हेही वाचा: DCC Bank Election : साताऱ्यात लवकरच राजकीय भूकंप?

loading image
go to top