

Ajit Pawar elected as MOA President for 4th time
ESakal
मुंबई : उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या (एमओए) अध्यक्षपदी सलग ४ वेळा पुन्हा एकदा सर्वसंमतीने निवड झाली आहे. अजित दादांच्या या विजयामुळे राजकारणासोबतच त्यांची क्रीडा क्षेत्रावर सुद्धा भक्कम पकड असल्याचं अधोरेखित झालं आहे.