Devendra Fadnavis Video : फडणवीस म्हणतात, 'द केरळ स्टोरी' हा सिनेमा नसून जागृतीची मोहीम; आव्हाडांवरही बोलले

Devendra Fadnavis Video : फडणवीस म्हणतात, 'द केरळ स्टोरी' हा सिनेमा नसून जागृतीची मोहीम; आव्हाडांवरही बोलले

नागपूरः राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट आज बघत आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून समाजावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फुटली असून ही जगृतीची मोहीम आहे. असं मत त्यांनी व्यक्त केलं.

देशभरात सध्या 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाची चर्चा आहे. केरळमध्ये हिंदू मुलींचं धर्मांतर केलं जातं. त्यानंतर त्यांचा छळ केला जातो, असं दाखवण्यात आलेलं आहे. त्यामुळे चित्रपटाला विरोध होतांना दिसतोय.

तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये 'द केरळ स्टोरी'च्या प्रदर्शनावर बंदी आणण्यात आलेली आहे. देशभरातून चित्रपटाबद्दल उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. पाच दिवसांमध्ये ३५ कोटी रुपये या चित्रपटाने कमावले आहे.

Devendra Fadnavis Video : फडणवीस म्हणतात, 'द केरळ स्टोरी' हा सिनेमा नसून जागृतीची मोहीम; आव्हाडांवरही बोलले
पाक लष्कराचा आंदोलकांवर गोळीबार! सरकारी रेडिओ स्टेशन पेटवलं, परिस्थिती नियंत्रणाबाहेर...

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नागपूरमध्ये आहेत. कार्यकर्त्यांसोबत हा चित्रपट बघत असल्याचं फडणवीसांना सांगितलं. ते म्हणाले की, मी आणि काही कार्यकर्ते केरळ स्टोरी बघणार आहोत. देशाचं विदारक सत्य समोर आणलं जात आहे. कशा प्रकारे समाजाला त्रास दिला जतोय आणि महिलांवर अन्याय होतोय. हे दाखवलं गेलं आहे. लोक जागृत होत असून हा सिनेमा नसून जागृतीची मोहीम आहे, असं फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis Video : फडणवीस म्हणतात, 'द केरळ स्टोरी' हा सिनेमा नसून जागृतीची मोहीम; आव्हाडांवरही बोलले
Vivek Agnihotri : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीकडून ममता बॅनर्जीना कायदेशीर नोटीस

दरम्यान, द केरळ स्टोरीच्या दिग्दर्शकाला फाशी दिली पाहिजे, असं वादग्रस्त विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. त्यावर फडणवीसांनी आव्हाडांवर कारवाई केली जाईल, असं म्हटलं आहे.

आज देवेंद्र फडणवीस हे नागपूर दौऱ्यावर असून त्यांनी हा चित्रपट बघणार असल्याचं म्हटलं आहे. सध्या या चित्रपटामुळे देशभर आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरु झालं आहे.

यादरम्यान, दिग्दर्शक सुदीप्तो सेननं एक खुलासा केला आहे की सिनेमाचा टीझर रिलीज झाल्यापासून एका मुलगा त्यांना लागोपाठ गलिच्छ भाषेत मेसेज करत आहे. द केरळ स्टोरीनं पहिल्या वीकेंडमध्ये ३३.३५ करोडची कमाई केली होती. तर रिपोर्ट अनुसार,सोमवारी सिनेमानं १०.५० करोडची कमाई केली. विरोध आणि बंदीचा सामना केल्यानंतरही 'द केरळ स्टोरी'ला अनेक ठिकाणी समर्थन मिळताना दिसत आहे. तर निर्मात्यांना आशा आहे की सिनेमा लवकरच ५० करोडचा आकडा पार करेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com