पावसा.. हे काय केलं रेss! चार दिवसांत घेतलास 74 जणांचा बळी

Pune Wall Collapse
Pune Wall Collapse

यंदाचा पावसाळा महाराष्ट्रासाठी संकट घेऊन आला. दुष्काळाने चिंताग्रस्त झालेल्या महाराष्ट्राला पावसाची प्रतीक्षा होती मात्र पावसासोबत अस्मानी संकटाने महाराष्ट्र हादरला आहे.  गेल्या चार दिवसांत विविध ठिकाणी घडलेल्या दुर्घटनेत एकूण 74 जणांचा मृत्यू झाला.

विभागनिहाय मृतांची संख्या

  • कोकण विभाग-24
  • एकट्या मुंबईत.25
  • पुणे-21
  • नाशिक-4 
  • मनुष्य हानी-74

तिवरे धरण फुटलं; सहा जणांचे मृतदेह हाती
गेल्या चार दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूण तालुक्यातले तिवरे धरण भरण वाहू लागले आहे. अतिवृष्टीमुळे हे धरणं फुटले आहे. या धरणाजवळ असलेली एक पूर्ण वाडी वाहून गेली आहे. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह सापडले आहेत. मात्र या घटनेत आणखी २४ जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे.

नाशिकमध्ये पाण्याची टाकी कोसळून चार जणांचा मृत्यू
मुंबई-पुण्यापाठोपाठ दुर्घटनेचं लोण पोहोचलं ते नाशिकमध्ये. इथंही बांधकाम व्यावसायिकाचा निष्काळजीपणा समोर आला. 2 जुलैला नाशिकमध्ये सम्राट ग्रुपच्या सातपूर इथल्या अपना घर प्रोजेक्टमध्ये बांधकाम सुरू असताना पाण्याची टाकी फुटली. यावेळी तिथं काम करणारे जवळपास 5 कामगार या टाकीखाली अडकले होते.

पुण्यातील कोंढव्यात संरक्षक भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू 
कोंढव्यात बांधकामाच्या ठिकाणी उभारलेल्या तात्पुरत्या पत्र्याच्या शेडवर शुक्रवारी मध्यरात्री शेजारील इमारतीची संरक्षक भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला. मृतांमधील सर्व जण बिहारमधील बांधकाम मजूर व त्यांचे कुटुंबीय असून, चार लहान मुलांचाही त्यात समावेश आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी बांधकाम व्यावसायिकांसह आठ जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. 

पुण्यात आंबेगावमध्ये भिंत कोसळून सहा ठार
पुणे : पुण्यात पुन्हा एकदा सीमाभिंत मजुरांच्या झोपड्यांवर पडून सहा जण दगावल्याची घटना आंबेगाव परिसरात सोमवारी मध्यरात्री घडली. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. मृत व जखमींची नावे समजू शकली नाहीत. कोंढवा परिसरात शुक्रवारी सिमाभींत पडून 15 मजुरांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर लगेच दोन दिवसांत ही घटना घडली आहे. 

मालाडमध्ये भिंत कोसळून 22 जणांचा मृत्यू
मालाडमधील पिंपरीपाडा परिसरातील झोपड्यांवर भिंत कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. यातील मृतांचा आकडा 22 वर पोहोचला आहे. तर जवळपास 75 जण जखमी झाले आहे. या सर्व जखमींवर शताब्दी, ट्रामा केअर सेंटर, कुपर, एम.डब्ल्यू रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com