Vinayak Mete: विनायक मेटे यांच्या निधनानंतर शिवसंग्राम पक्षात फुट?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्याचा निर्णय
Vinayak Mete
Vinayak Meteesakal

राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे गटात इनकमिंग सुरूच आहे. ठाकरे गटातील शिवसेना फुटून एकनाथ शिंदे गटासोबत जात असल्याचे दिसत आहे. मात्र आता शिवसंग्राम पक्षाचे दिवंगत अध्यक्ष विनायक मेटे यांचे सहकारी, पक्षातील तरुण चेहरा म्हणून ओळखे जाणारे शिवसंग्राम युवकचे प्रदेशाध्यक्ष उदय आहेर यांनी पक्षाला राम राम करण्याचा निर्णय घेतलाय.

हेही वाचा: Bhagatsingh Koshyari: पवार, गडकरींची तुलना थेट शिवाजी महाराजांशी, राज्यपाल पुन्हा घसरले

आहेर अनेक वर्षांपासून शिवसंग्राम पक्षाचे काम करत आहेत. मात्र शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांच्यासोबत झालेल्या वादामुळे त्यांनी आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळात आहे.

तर "विनायक मेटे यांच्या निधनानंतर शिवसंग्राममध्ये नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झालीय. फक्त शिवसंग्रामच नाही तर इतरही मराठा समाज आणि बारा बलुतेदार समाजासाठी विनायक मेटे यांचा आधार होता." असं उदय आहेर म्हणाले.

हेही वाचा- महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा....

या बातमीने विनायक मेटे यांच्या जाण्याने शिवसंग्राम पक्षात फुट पडणार त्यामुळे आता पक्षात कोणते नेते राहतात हे पाहवं लागणार आहे, दरम्यान शिवसंग्राम मधील जवळपास 90 टक्के पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा देणार आहे. ही माहिती उदय आहेर यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com