मुंबई - अंतरवाली सराटी येथे दोन वर्षांपूर्वी मराठा आंदोलनाच्या वेळी झालेल्या दंग्यामध्ये २०० पेक्षा अधिक मराठा आंदोलकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे मागे घेतले जावेत यावर मंगळवारी मराठा उपसमितीच्या बैठकीत चर्चा झाली.
मात्र हे गुन्हे अत्यंत गंभीर असल्याने ते मागे घेण्यात अडचणी असल्याचे गृहविभागाने यासाठी स्थापन केलेल्या समितीचा अहवालात नमूद केले असल्याचे समजते. हे गुन्हे मागे घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी उपसमिती चर्चा करणार आहे.